सत्तेत असताना काही करायचं नाही पण सत्ता गेली की अमूक का केलं नाही, तमूक का केलं नाही, असे प्रश्न विचारायचे. यासाठी वेगळी हिंमत लागते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.
वीजबिल माफी तसेच पीक विमा मुद्द्यावरून सध्या अनेक आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. त्यावरून प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांनी उपरोक्त विधान केले.
वीजबिल माफी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील सभेत देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हीडिओ ऐकविला आणि त्यावरून त्यांनी वीजबिल माफीची भाषा केली होती, मग आता सरकारमध्ये असताना वीजबिलमाफ का करत नाहीत, असा सवाल विचारला. फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्या व्हीडिओतील फडणवीसांचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी ऐकविले.
फडणवीस याबाबत म्हणाले की, वीजबिल माफ करा असे मी केव्हाही म्हणालो नाही, मी ज्यावेळी कोरोना होता, तेव्हा मध्य प्रदेशने कोरोना काळात वीजबिल माफ केले त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कोरोना काळात वीजबिल माफ करा असे आवाहन मी केले होते. पण तेव्हाचे सरकार इतके निर्दयी होते की, एका नव्या पैशाची सूट त्या सरकारने शेतकऱ्यांनी दिली नाही. त्यांना बोलायचा आज अधिकारच नाही. त्यांनी आपल्या सत्ताकाळात शेतकऱ्यांना इतके नागवले आहे की, त्या काळात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शनही त्यांनी कापले. त्यामुळे हे कोणत्या तोंडाने बोलत आहेत.
हे ही वाचा:
‘गांधी हत्येचे धागेदोरे हे काँग्रेसपर्यंत पोहोचतात’
आफताबवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप
सावरकरांवर बोलायची लायकी आहे का राहुल गांधींची! गुळगुळीत मेंदूचा
‘डीजे स्नेक’ कार्यक्रमात चाहत्याना चोरांचा दंश
आम्ही जे बोलतो ते करतो. मी तात्काळ सांगितले की, रब्बीचा हंगाम आहे. कुणीही वीज कनेक्शन तोडू नये. केवळ हे तोंडाने बोललो नाही तर पहिल्यांदा यासंदर्भात लेखी आदेश काढले. कंपनीने अधिकाऱअयांना निर्देश काढले की, चालू बिल घ्या, थकबाकी विचारायची नाही. हे बोलणारे आहेत यांनी जनाची ठेवावी आणि मनाचीही ठेवावी.
पीकविम्याची तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली होती, त्यावर फडणवीस म्हणाले की, विमा कंपनीवर मोर्चा काढतात, काचा फोडतात, पण हे सत्तेत असतात तेव्हा विमा कंपनीला फायदा मिळवून देतात. सर्वात जास्त फायदा विमा कंपनीला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाला. एका वर्षी तर अडीच तीन हजार कोटी रुपये विमा कंपन्यांना देऊ टाकले. आपल्या शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाहीत. कारण यंत्रणाच काम करत नव्हती. खरे तर सत्तेबाहेर वेगळे आणि सत्तेत वेगळे. यापूर्वी सत्तेत नव्हते, मुख्यमंत्री नव्हते, मंत्री नव्हते आता अडीच वर्षांबद्दल विचारले जाते. यालाही वेगळीच हिंमत लागते. सत्तेत गेल्यावर प्रश्न विचारायचे.