21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणहोय, मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून!

होय, मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून!

Google News Follow

Related

देवेंद्र फडणवीस यांनी दिले घणाघाती उत्तर

आम्ही मुंबई तोडणार आहोत, असे नेहमी शिवसेनेचे उद्धव ठाकरे सांगतात. मुद्दा नसला की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा करतात. होय, आम्हाला मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून, अनाचारापासून, दुराचारापासून, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. हिंदी भाषिक सभेत बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेच्या आदल्या दिवशीच्या भाषणाचा पुरता समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी भाजपाला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, असे वक्तव्य केले होते, त्याला फडणवीसांनी आज उत्तर दिले.

ते म्हणाले की, यांनी भ्रष्टाचार करताना रस्ते पाणी, नाले, गटारी काहीही सोडले नाही. मुंबई कोण तोडू शकतो? कुणाचा बाप हे करू शकतो? तुम्हाला इतिहासात नेतो मी. महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियरमध्ये पाहा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या घटकांत जनसंघ होता. तुमचा पक्ष पैदाही झाला नव्हता. संयुक्त महाराष्ट्र समिती व जनसंघाच्या तिकिटावर उत्तमराव पाटील व प्रेमजीभाई आशर निवडून आले होते. पण हे तुम्ही कधी तपासणार?

हे ही वाचा:

जितेंद्र जोशी ठरला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलचा सर्वोत्कृष्ट अभिनेता

आपल्या राजकारणात ओढून ताणून प्रबोधिनीसारख्या ज्ञानकेंद्राला खेचू नये

थॉमस कप विजेत्या संघाला भारत सरकारने घोषित केला विशेष पुरस्कार

ताजमहलबाबतची ‘ही’ तथ्ये दुर्लक्षिता येणार नाहीत…

 

तुमचे जे चालले आहे मुंबई तोडण्याची भाषा वगैरे तर तुम्हाला आठवण करून देतो. लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. काय म्हणाले, आम्ही मुंबईचे बाप म्हणे! अनौरस पुत्र ऐकला होता, अनौरस बाप कुठून आला. मुंबई महाराष्ट्राचा एकच बाप छत्रपती शिवाजी महाराज, असेही फडणवीस यांनी सुनावले.

आयपीएलसारखे राज्य चालवता!

पंतप्रधानांची बैठक आयपीएलसारखी ऐकली, असे उद्धव म्हणतात, तिथे तर सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री होते. आयपीएल समजून तुम्ही पंतप्रधानांच्या बैठकीत बसत असाल तर तुम्ही राज्यही आयपीएल समजूनच चालवत आहात. पण सवाल आहे. तुमचं मनोरंजन होतं आहे. नांदेडमध्ये अतिरिक्त उस विकत घेतला नाही म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केल. त्याच्याकडे कोण पाहणार आहे? आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडे कोण पाहणार आहे? ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवलं त्यांच्याकडे कोण पाहणार आहे? शेतमजूर, बारा बलुतेदारांकडे कोण पाहणार आहे? तुमचं मनोरंजन चाललं आहे. सामान्य माणसाची होरपळ होते आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, आम्ही मुंबईसाठी काय काय केलं? मेट्रो, इंदु मिल, लिंक रोड, नवी मुंबई एअरपोर्ट हजारो गोष्टी आम्ही केल्या. तुम्ही विकासावर काही बोलत नाही. कर्तृत्व काय दारूवर टॅक्स कमी, बारवर टॅक्स कमी, बिल्डरवर सवलतींचा वर्षाव बाकी होत न आज्ञा बिन पैसा रे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा