‘मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री, पण पवारसाहेब एकदाही सलग पाच वर्षे नव्हते’

‘मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री, पण पवारसाहेब एकदाही सलग पाच वर्षे नव्हते’

देवेंद्र फडणवीस यांनी लगावला टोला

मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. ४० वर्षांनंतर पाच वर्षे सलग मुख्यमंत्री राहिलेला मी नेता आहे. पण पवारसाहेब चारवेळा मुख्यमंत्री झाले असले तरी सलग पाच वर्षे ते राहिले नाहीत. मी विरोधी पक्षनेता म्हणूनही समाधानी आहे, त्यामुळे विरोधी पक्ष कासावीस झाला आहे, हीच माझ्या कामाची पावती आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना जबरदस्त टोला लगावला.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात फडणवीसांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला, पण फडणवीसांनी त्यांना हे चोख उत्तर दिले की, आपण पाच वर्षे सलग मुख्यमंत्री राहिलो. तशी कामगिरी पवारांना चारवेळा मुख्यमंत्री राहूनही करता आली नाही.

फडणवीस यांनी मावळच्या घटनेबद्दल पवारांनी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, पवारांची ही पत्रकार परिषद नेमकी कशासाठी होती हेच लक्षात आलं नाही. इतक्या विषयांवर बोलले. मावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. पण त्यांना सरकारचे आदेश असणारच. जालियनवाला बागमध्येही ब्रिटिशांच्या पोलिसांनीच गोळीबार केला होता, तिथे काय गव्हर्नर जनरल गेले नव्हते. पण गव्हर्नरच्या आदेशावरून तो झाला होता. आम्ही जेव्हा म्हणतो की, हा गोळीबार जालियनवाला बाग सारखा आहे, तेव्हा मावळमध्ये राज्यकर्त्यांना गोळीबार करण्यासाठी जायचे नव्हते तर पोलिसच तो गोळीबार होते. उत्तर प्रदेशमधील घटनेबाबत इथे बंद करता, धुडगूस करता, हिंसा होते. पहिल्यांदा बघितले पोलिस संरक्षणात राज्यकर्ते बंद करतात, त्यांचा माल घेऊन पळतात, पोलिस बघ्याची भूमिका घेतात असा सवाल आज विचारावासा वाटतो.

 

हे ही वाचा:

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा अधिकार नाही

…म्हणे मावळमधील गोळीबार भाजपाने भडकाविल्यामुळे!

राज्यातील महाविद्यालये सुरू होण्यास सापडला मुहूर्त

‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा टंचाईचे संकट’

 

गेले दोन दिवस सगळ्या चॅनेलवर दे व्हीडिओ बघितला त्यावरून बंद किती शांततेत पार पडला हे आपण बघतोच आहोत. धमकावले जात आहे, दुकाने बंद केली जात आहेत. हा स्टेट स्पॉन्सर्ड भीती निर्माण करून केलेला बंद आहे.

Exit mobile version