देवेंद्र फडणवीस यांनी केली टिप्पणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक तासाची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला होता, त्यावर बोलताना फडणवीस यांनी टीव्ही९ ला दिलेल्या मुलाखतीत प्रत्युत्तर दिले की, पवारांनी निराशेतून दिलेली ही धमकी आहे. शेवटी पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. या वयात त्यांना ही परिस्थिती पाहावी लागते. त्यांच्या पक्षाचे गृहमंत्रीच आतमध्ये आहेत. आमच्या लोकांविरुद्ध कराल तर तुम्ही लक्षात ठेवा, असा इशारा ते राष्ट्रीय तपास यंत्रणांना देत आहेत. पण त्याने काही फरक पडत नाही. जे काही आहे ते पुराव्यांच्या आधारे आहे. कुणालाही बळीचा बकरा बनवला जात नाही. सत्य कधी लपत नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर सविस्तर उत्तरे दिली. पुन्हा लॉकडाऊनची सध्या तरी गरज वाटत नाही. पण कोरोनाच्या बाबतीत जे निर्णय घ्यावे लागले त्याला आमचे समर्थन असेल. ऑमिक्रोनच्या बाबतीत तशी वेळ मात्र अजून आलेली नाही, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, संकट आलं तर संधीत रूपांतर केलं असे मुख्यमंत्री म्हणतात पण कुठली संधी आहे हे समजले नाही. कोरोना काळात सर्वाधिक ३५ टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. ४० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे सगळं होत असताना शेतकऱ्यांना मदत केली नाही. बारा बलुतेदारांना नवा पैसा दिला नाही. केंद्राने मात्र मदत दिली. राज्य सरकारने एकालाही मदत केली नाही. पूर, अतिवृष्टी एकालाही मदत केली नाही.
आरोग्यव्यवस्था चांगली झाली असे सरकार म्हणते पण, रुग्णालयाला आगी लागून मृत्यू झाले ही चांगली आरोग्यव्यवस्था आहे का? एक आग लागली की भावनिक आवाहन करायचं की आम्ही यापुढे असे होऊ देणार नाही. आगप्रतिबंधक योजना लालफितीत आहे. उलट, या घटनेला केंद्र कसे जबाबदार आहे, केंद्राने दिलेले व्हेन्टिलेटर कसे जबाबदार आहे, हे सांगितले जात आहे. संधीसाधूंनी संकटाचं स्वतःच्या संधीत रूपांतर करून भरपूर पैसा कमावावा हेच इथे झाले.
हे ही वाचा:
चार वर्षे झाली तरी हुतात्मा ‘चौका’चे हुतात्मा ‘स्मारक’ का झाले नाही?
मोहित कंबोज मानहानी प्रकरणात नवाब मलिकांना जामीन
प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाईंसह १२ खासदार निलंबित
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचा शिक्का! राज्यसभेतही बिल पारित
फडणवीस म्हणाले की, इथे सरकार आहे पण प्रशासन नाही. बदल्यांचा भ्रष्टाचार सुरू आहे. पैशांची देवाणघेवाण करून बदल्या होत आहेत. जिल्ह्याजिल्ह्यात साखळ्या तयार झाल्यात. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेपेक्षा कोरोनाकाळात कोण गेले लोकांपर्यंत? मुख्यमंत्र्यांच्या शारीरिक अडचणी आहेत ठीक आहे, पण पालक मंत्री का गेले नाहीत? मी आयसीयूत गेलो, लोकांची दुःख समजून घेतली. मी गेलो तेव्हा प्रशासनालाही आनंद व्हायचा की तुम्ही तरी आलात. कुणी तरी मार्गदर्शन करेल.
सरकार पाच वर्षे टिकेल का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, सरकार अंतर्विरोधामुळे पडेल. अशी सरकारं टिकत नाहीत. पण पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की, अंतर्विरोधामुळे पडेल