विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला सभागृहात घणाघात
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनचा बॉम्ब फोडला आणि त्यामुळे अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला. सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी केलेल्या कारस्थानाची पोलखोल फडणवीस यांनी केली आणि महाविकास आघाडी सरकारवर आभाळच कोसळले.
जे व्हीडिओ फडणवीस यांनी सभागृह अध्यक्षांकडे दिले त्यातील मजकूरही त्यांनी वाचून दाखविला. फडणवीस जसजसे हे सगळे उलगडून सांगू लागले तसतसे महाराष्ट्रातील विरोधकांविरोधात केलेले षडयंत्र उघडकीस येऊ लागले.
गिरीश महाजन यांच्याविरोधात २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात चाकू प्लांट करण्यापासून गळ्याला रक्त लावणअयापासून ते ड्रग्सचा धंदा दाखविण्यापर्यंत कारस्थान केले गेले. तेही एका सरकारी वकिलामार्फत.
यातील एकेक व्हीडिओ आणि त्यात झालेले संवाद फडणवीस यांनी वाचून दाखविले. हे व्हीडिओ नंतर सर्व माध्यमांकडेही देण्यात आले. त्यातील काही संवाद असे
हे ही वाचा:
भारतीय बनावटीच्या मेट्रोची ‘ही’ खास वैशिष्ट्य
विरोधकांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सरकारी’ कट!
हजारो पात्र खातेदारांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नाही
महिलांवर अत्याचार करणाऱ्या तालिबानकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
वकिलांचा संवाद : आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशतच पसरवणे असे सांगायचे आहे. ड्रग्सचा व्यवसाय करतो हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोक्का लागेल. सट्ट्याच्या पैशातून मोक्का लागत नाही. पण सट्ट्याच्या पैशातून ड्रग्स म्हटले की मोक्का लागेल. १ ग्रॅमला १ लाख रुपये मिळतात.
दुसऱ्या व्हीडिओतील संवाद
वकील म्हणतात : तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का? ड्रग्सचे नाव घेतले की, आपला मोक्का फिट बसतो,
वकील म्हणतो : सारे जबाब मी लिहून दिले होते. त्यांनी हरवून टाकले. सगळा गोंधळ केला. पवार साहेबांनी डीजींना सांगितले. किती मीटिंग झाल्या. सीपीला रात्रभर बसविले. रजत नागपूरला निघून गेला. सीपीचे फोनवर फोन आले. सर्व निगेटिव्ह होते. शेवटी पवार साहेबांना सांगून अधिकारी बदलविला. अनिल देशमुख असते तर फायदा झाला असता. अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पानच हलायचे नाही.
पुढच्या व्हीडिओत वकिल म्हणतो : अजित पवार सपोर्ट करत नाहीत. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार पाच चांगल्या अधिकाऱ्यांची नावे असतील तर द्या.
प्रवीण चव्हाण कट कसा रचत आहेत याचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेल्या संभाषणात ते रेडमध्ये सहभागी होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. कुठल्या मार्गाने जायचे आणि काय काय करायचे याची सूक्ष्म व्यवस्था सरकारी वकील ब्रीफ करतात. जेवणाची राहण्याची व रूम कुणाच्या नावाने बुक करायच्या, कॅशमध्ये पैसे कसे द्यायचे हे ते वकील सांगतात. यासाठी मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या. ते सगळे पैसे देतील असेही वकील म्हणतात.
गिरीश महाजन अटकत नाही. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डीजीला भेटणार आहे.
दुसऱ्या व्हीडिओत वकील म्हणतो, कुणाला अटकवायचे, जयकुमार रावल, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, संजय कुटे, मुनगंटीवार. फडणवीस, महाजन, रावल, सुभाष देशमुख, मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील, बावनकुळे यांच्या फायली तयार आहेत. हेच आपले टार्गेट आहेत. शरद पवारांना फडणवीस आणि महाजन यांना संपवायचेच आहे. १ लाख १ टक्के. त्यासाठी महाजन, फडणवीस यांना अडकवणारच.