26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणनवाब मलिकसारखी व्यक्ती मंत्रिमंडळात होती, याचे बाळासाहेबांना काय उत्तर देणार?

नवाब मलिकसारखी व्यक्ती मंत्रिमंडळात होती, याचे बाळासाहेबांना काय उत्तर देणार?

Google News Follow

Related

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

नवाब मलिकांचा आम्ही राजीनामा मागतोय तर पवार म्हणतात देणार नाही. उद्धव देणार नाही म्हणतात. उद्धवजींना सवाल आहे बाळासाहेबांना उत्तर द्यायचे आहे, मंत्रिमंडळात असा व्यक्ती होता तर काय उत्तर द्याल. आम्हाला जेव्हा ते प्रश्न विचारतील तेव्हा आम्ही सांगू की आम्ही नवाब मलिकांविरोधात संघर्ष केला, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात केलेल्या भाषणात महाविकास आघाडीविरोधात घणाघात केला. नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा काढण्यापूर्वी आझाद मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा फडणवीस यांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली.

ते म्हणाले की, जोपर्यंत बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार केलेल्या मलिकचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ही राजकीय मागणी नाही. केवळ राजकारणासाठी बोलत नाही. रोज घटना घडतात आम्ही रोज राजीनामा मागत नाही. पण लक्षात घ्या ही घटना राज्याकरता लाजिरवाणी घटना आहे. बॉम्बस्फोटातला आरोपी सरदार शाहवली खानवर आरोप आहे. त्याने याकुब मेमनसोबत कट केला एवढेच नव्हे तर बॉम्ब कसा बनवायचा याचे प्रशिक्षण घेतले. तो बॉम्ब स्कूटरमध्ये ठेवला. तो शाहवली खान आज जेलमध्ये आहे. जन्मठेप झाली आहे. दाऊद इब्राहिम महाराष्ट्रात रिअल इस्टेटचा धंदा चालवून त्याच पैशाच्या मदतीने मुंबईत स्फोट घडवत होता. त्या हसिना पारकरचा फ्रंट मॅन सलीम पटेल यांनी कट रचला. मुनीरा बाईची जमीन घेतली. जमिनीचा भाव कोट्यवधीचा होता पण सरकारी भावही २ हजार रु. चौरस फूट होता. या हरामखोरांनी पॉवर ऑफ अटर्नी तयार केली ती सॉलिडसला विकली. हे सॉलिडस नवाब मलिकचे आहे. त्याने जमीन घेतली ते बॉम्बस्फोटात असलेल्या आणि जेलमध्ये असलेल्या व्यक्तीकडून. २५ रु. चौ. फुट भावाने नवाब मलिकांनी ही जमीन विकत घेतली. उकिरड्याची जागाही २५ रु चौ. फुटाने मिळत नाही. मग ही जमीन कशी मिळाली?

हे ही वाचा:

फडणवीसच तुमचा बाजार उठवतील!

मलिकांवर आरोप गंभीर, तरी पाठीशी पवार खंबीर

नवाब हटाओ! भाजपाचा आज मुंबईत विराट मोर्चा

भारताच्या ‘या’ कामगिरीसाठी पाक विद्यार्थीनीने मानले आभार

 

फडणवीस म्हणाले की, सवाल आहे तुम्हाला लाज का वाटली नाही. या जमिनीच्या विक्री पत्रात हरामखोराचा फोटो आहे. शहावलीखान, सलीम पटेल व नवाब मलिकच्या मुलाचा फोटो. लाज का वाटली नाही मुंबईच्या हत्याऱ्यांशी डील करताना? ते लोक का दिसले नाहीत का? ज्यांच्या चिंधड्या उडाल्या तो आक्रोश का तुम्हाला का दिसला नाही? घरसंसार उद्ध्वस्त झाले ती मुंबई का दिसली नाही? मुंबईची शकले झाली पैशाकरता आंधळे झाले की शहावलीखान कडून कागदपत्रे करून खोटेपणा केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा