‘ठाकरे सरकारमध्ये समन्वय आहे कुठे?’

‘ठाकरे सरकारमध्ये समन्वय आहे कुठे?’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आरोप

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भातील शिक्षण विभागाच्या निर्णयाला टास्क फोर्सने स्थगिती दिली असल्याची माहिती आज राज्य सरकारकडून देण्यात आली. यावरून भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारची परखड शब्दांत कानउघडणी केली.

ठाकरे सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, राज्यात सध्या टास्क फोर्स, राज्यातील मंत्री, राज्य सरकार यांच्यामध्ये कोणताही ताळमेळ नाही. अशा प्रकारच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश जातो. सरकारला वाटत असेल शाळा सुरु नाही करायच्या तर नाही केल्या पाहिजे. मात्र, एकत्रितपणे अशा प्रकारचे निर्णय झाले पाहिजे. चुकीच्या निर्णयामुळे पालकांमध्येही संभ्रमावस्था निर्माण होते. ‘या सरकारमध्ये शाळा सुरू करण्याबाबत समन्वयाचा अभाव आहे. मंत्री, टास्क फोर्स आणि सरकार वेगळ्या घोषणा करतात. याचा पालकांना त्रास होतोय, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

१७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला होता.  सरसकट शाळा सुरू न करण्याचा विचारही करण्यात आला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व टास्क फोर्सच्या बैठकीतील चर्चेत असे केल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येईल, असे सांगत टास्क फोर्सने या निर्णयाला स्थगिती देण्याचा सूचना केली होती. त्यानंतर राज्य सरकारने आज शाळा सुरु करण्याचा जीआरला स्थगिती दिली.

हे ही वाचा:

आधारकार्ड, पॅनकार्डबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल! वाचा…

अपघातग्रस्त तरुणाला दिला दुसऱ्या तरुणाने मदतीचा ‘हात’

भारताचे ५४ खेळाडू उतरतायत पॅरालिम्पिकमध्ये

भाजपा नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला

शाळा सुरु करण्याबाबत मंत्री करत असलेली विधाने ही खरोखरच बाष्कळ आहेत हे आता नागरिकांनाही कळू लागलेले आहे. मंत्री, सरकार तसेच कृतीदल करत असलेल्या या घोषणांमुळे पालक संभ्रमावस्थेत पडले आहेत. त्यामुळेच किमान ठाकरे सरकारने आता तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठोस निर्णय जाहीर करणे हे गरजेचे आहे, असे मतही यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केले.

Exit mobile version