‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’

‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’

औरंगाबाद येथे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण सध्याची परिस्थिती तशी नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत. आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, त्यांना आता रिअलाईज झालं असेल , त्यामुळे त्यांना शुभेच्छा, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

अधिक बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडत आहोत. हे जे अनैसर्गिक गटबंधन झालं आहे, हे फार काळ चालू शकत नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असेल, अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल.

हे ही वाचा:

‘अपमानित’ कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

…आणि भाईगिरीतून मित्रानेच केली मित्राची हत्या!

अवघ्या ५५ मिनिटांत लिव्हर आणि किडनी पोहोचले ५० किमीवर

‘राजकारण संन्यासी’ बाबूल यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

यावेळी फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलबाबतही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मी स्पष्टपणे सांगतो, काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे भाव वाढतायेत म्हणायचं आणि देशात एक भाव करण्याकरिता जीएसटी आणून २०-२५ रुपये दर कमी होऊ शकतात त्याला विरोध करायचा. हे दुटप्पी आहे. यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीला पेट्रोल डिझेलवर बोलू नये, विरोध केल्यास आंदोलन करु, असंही यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Exit mobile version