31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणफडणवीस म्हणाले, खोटा नरेटिव्ह तीन दिवस चालतो

फडणवीस म्हणाले, खोटा नरेटिव्ह तीन दिवस चालतो

पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंना दिले उत्तर

Google News Follow

Related

महाराष्ट्रातून कसे प्रकल्प बाहेर चाललेत याविषयी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले. त्यावेळी हे आरोप म्हणजे खोटा नरेटिव्ह असल्याचे सांगत असा नरेटिव्ह तीन दिवस चालतो. पण सत्य हे कायम चालते असे फडणवीसांनी विरोधकांना सुनावले.

एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, गुजरातचेच प्रकल्प काहीजणांना दिसतात. त्यांना गुजरातचा चष्मा लागला आहे. यूपीत प्रकल्प झाले. तामिळनाडूला झाले, हा हैदराबादला (सॅफ्रन प्रकल्प) गेला. पण गुजरात जास्त दिसतो. ते सोयीचेही असते.

हे ही वाचा:

आजपासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

रस्ते अपघात मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

अलीबागला जा आता अवघ्या ४० मिनिटात

 

‘एचएमव्ही’ पत्रकारांवर शरसंधान

नाणार महाराष्ट्रातच होईल हे आम्ही म्हटलेले आहे. तो प्रकल्प रद्द होऊ देणार नाही. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेली गुंतवणूक परत पाठवली. राज्याचे अतोनात नुकसान केले. आज मात्र ते बोलत आहेत याचे आश्चर्य वाटते अधिक आश्चर्य याचे वाटते ते हे की तेव्हा गुंतवणूक जात असताना कुठलेही एचएमव्ही बोललेले नाहीत. एचएमव्ही म्हणजे His masters voice. महाराष्ट्राप्रती आताची संवेदना दिसते ती तेव्हा कुठे होती. २५ हजार कोटींच्या प्रकल्पांना आम्ही कॅबिनेटमध्ये मान्यता दिली. पण त्यासंदर्भात कुणीही एचएमव्हीनी ट्विट केले नाही, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी सांगितले की, या वातावरणामुळे येणारा उद्योजक महाराष्ट्रापासून दूर चालला आहे. महाविकास आघाडीचे हे षडयंत्र तर नाही ना. गुंतवणूकदार संभ्रमात पडले पाहिजे. राज्य गुंतवणूकीपासून वंचित राहिले पाहिजे. म्हणून मी पुराव्यासह काही गोष्टी स्पष्ट केल्या. हे प्रकल्प महाराष्ट्रात आले नाहीत याला मविआ जबाबदार आहे. त्यांचे पाप आहे आमच्या माथी ते मारू नका. पंतप्रधान सगळ्या राज्यांना सारखीच वागणूक देतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा