दंगल घडविण्यामागे कुणाची तरी फूस, आम्ही अद्दल घडवू!

पुण्यातील दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा

दंगल घडविण्यामागे कुणाची तरी फूस, आम्ही अद्दल घडवू!

अकोला आणि अहमदनगर येथे झालेल्या दंगलीच्या घटनांना कुणीतरी फूस लावत असून दंगल घडविणाऱ्यांना आम्ही अद्दल घडवू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

पुणे येथे विविध कार्यक्रमांसाठी देवेंद्र फडणवीस आलेले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. या दोन शहरातील दंगलीबाबत प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणाले की, अकोला आणि अहमदनगर या ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे. कुठेही अघटित असे काही घडलेले नाही. काही लोक परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दंगली घडविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना अद्दल घडविणार.

फडणवीस म्हणाले की, या घटना १०० टक्के जाणूनबुजून होत आहेत. याच्या मागे कुणाची तरी फूस आहे. कुणीतरी जाणीवपूर्व कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सफल होणार नाहीत आम्हीही त्यांना सोडणार नाही. काही संस्था आहेत, काही लोक आहेत ते मागून या घटनांना साथ देत आहेत. आगीत तेल ओतत आहेत. ते आम्ही बाहेर आणू.

हे ही वाचा:

कर्नाटकमधील काँग्रेस विजयाच्या व्यूहरचनेचा हा शिल्पकार

परीक्षेत नापास झाल्यामुळे तिने अपहरणाचे नाट्य रचले!

भारत वि. ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपपासून आयसीसीकडून ‘हे’ तीन नवे नियम लागू

आता ९२८ संरक्षण उत्पादनांची निर्मिती होणार भारतात

१६ आमदारांच्या मुद्द्याबाबत ठाकरे गटाचे नेते विधानसभा सचिवांना भेटले आहेत, त्याबद्दल फडणवीस म्हणाले की, जे काही चालले आहे, कुठल्या लोकशाहीत बसते. विधानसभा अध्यक्षांना आम्ही घेराव घालू, आम्ही त्यांना फिरू देणार नाही, असे म्हटले जात आहे. विधानसभा अध्यक्ष या दबावाखाली काम करत नाहीत. तुम्ही खरे असाल तुमचा मुद्दा त्यांच्याकडे मांडा. पण तुम्हाला माहीत आहे तुमची बाजू कमकुवत आहे म्हणून अशी भाषा वापरली जाते. विधानसभेचे अध्यक्ष निष्णात वकील, कायदा समजणारे, प्रॅक्टिस केलेले आहेत. बेकायदेशीर काम करणार नाहीत. अध्यक्षांना ते समजते. ते निर्णय घेतील. दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी अध्यक्ष त्या दबावाला बळी पडणार नाहीत.

Exit mobile version