22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणओबीसी आरक्षण गेले हे महाविकास आघाडीचे पाप!

ओबीसी आरक्षण गेले हे महाविकास आघाडीचे पाप!

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला घणाघात

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा केला असा घणाघात करत याविरोधात आपण एल्गार करण्याची गरज आहे. या आरक्षणासाठी आपण संघर्ष पेटवूया, हे आरक्षण गेले ते महाविकास आघाडीचे पाप आहे, अशी घोषणा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपाच्या कार्यकारिणीच्या निमित्ताने फडणवीस यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. त्यात फडणवीस यांनी ओबीसीचा मुद्दा प्रखरपणे मांडला.

ते म्हणाले की, ओबीसी प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने ८ वेळा तारखा घेतल्या त्यामुळे रागाने सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात लिहून ठेवले, की सरकारला काहीही करायचे नाही. त्यामुळे शेवटी न्यायालयाने हे आरक्षण स्थगित केले. तरीही इम्पिरिकल डेटा गोळा केला नाही. यासंदर्भात नेमलेल्या आयोगाने सांगितले की, पैसे नाहीत, स्टाफ नाहीत तरीही त्यांनी रिपोर्ट तयार करून सादर केला. पण सर्वोच्च न्यायालयात डेटा कुठून आला ते सरकारला सांगता आले नाही. रिपोर्टवर तारीख नाही, सही नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांच्याशी मी बोललो.

हे ही वाचा:

पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे पुन्हा बांधली जाणार

मालवणमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेली बोट बुडाली; दोन मृत्युमुखी

आशा भोसले म्हणतात, पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा!

जम्मू काश्मीर पोलिस पदकावरील शेख अब्दुल्लांचे चित्र हटवले; आता अशोकस्तंभ दिसणार

 

ते म्हणाले की, त्यांनी न्यायालयाकडे रिपोर्ट तयार करून दिला. तात्काळ न्यायालयाने मान्यता दिली. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेले हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. हे आरक्षण खरे तर एक वर्ष आधी मिळू शकले असते. नवाब मलिकना मंत्रिपदावर ठेवण्यासाठी खटपट करण्यापेक्षा ओबीसींचा रिपोर्ट तयार केला असता तर ते आरक्षण गेले नसते. खऱ्या अर्थाने ओबीसींवर अन्याय होत असताना हे इतके ढिसाळ काम करू शकत नाहीत. कुणाचे तरी डिझाईन आहे हे. कुठलेतरी षडयंत्र आहे. सापळा आहे. म्हणून याविरोधआत एल्गार करावा लागेल. ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसायचे नाही. त्यांनी षडयंत्र करून आरक्षण घालवलं आहे. आपण लढा सुरू ठेवला पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा