मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि इतर मंत्री मात्र स्वतःला मुख्यमंत्री मानतात!

मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि इतर मंत्री मात्र स्वतःला मुख्यमंत्री मानतात!

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. तर इतर जे मंत्री आहेत ते स्वतःला मुख्यमंत्री मानतात. त्यामुळे महाराष्ट्राची विश्वासार्हता धोक्यात आली आहे, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या भाषणात केली.

राज्यातील नेतृत्वावर आणि महाविकास आघाडीवर सडेतोड टीका फडणवीस यांनी केली. जनतेच्या प्रश्नांवर बोलायला कुणाला वेळ नाही. आमच्या काळात सर्व प्रश्नांवर चर्चा होत असे पण आता चर्चा कशावर होते तर गांजा, हर्बल तंबाखूवर, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी सांगितले की, जनतेच्या कल्याणासाठी आम्ही मैदानात उतरू. २०२४च्या आधी जर आमचे सरकार आले तर तो बोनसच. पण येणाऱ्या काळात भाजपाचे स्वतःचे सरकार आणून दाखवू.

फडणवीस यांनी सांगितले की, राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती.

फडणवीस यांनी त्रिपुरातील घटनेनंतर महाराष्ट्रात जो हिंसाचार माजविला गेला त्यावर टिप्पणी केली की, अमरावतीत SRP च्या ७ तुकड्या होत्या. पण त्यांना कोणते आदेश दिले गेले नाहीत. आझाद मैदानात जे झाले तोच पॅटर्न. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अटक नाही. आमचे पोलिस काय मार खाण्यासाठी आहेत आहे का? अमरावतीत जे घडले ती कोणती घटना नाही तर एक प्रयोग आहे. सावध व्हा.

 

हे ही वाचा:

…तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

मुंबई काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळला; सिद्दीकींचे जगतापांविरोधात पत्र

‘अनिल परब हे आडमुठेपणा करत व्हिलन बनत आहेत’

‘महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल’

 

आम्ही सर्वसमावेशकतेचे राजकारण करतो, पण लांगूलचालन करीत नाही. लांगूलचालन करणाऱ्या शक्तींना वाटत असेल की आता आपले सरकार आहे, तर आपण काहीही करू. पण भाजपचा कार्यकर्ता असे होऊ देणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Exit mobile version