30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणसोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांनी अंदमानच्या काळकोठडीत एकदा राहून दाखवावं

सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांनी अंदमानच्या काळकोठडीत एकदा राहून दाखवावं

Google News Follow

Related

मुंबई भाजपच्या “मराठी कट्टा”त देवेंद्र फडणवीस यांनी केला घणाघात

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर ज्या यातना भोगाव्या लागल्या, त्या दुर्दैवी होत्या. पण कधी वाटतं, ज्यांनी सोन्याचा चमचा घेऊन देशात जन्म घेतला, काळकोठडी कधी बघितली नाही ते जेव्हा म्हणतात सावरकर पळपुटे होते. तर माझे त्यांना आव्हान असेल एक दिवस अंदमानच्या काळकोठडीत राहून दाखवा, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपच्या वतीने आयोजित ‘मराठी कट्टा’मध्ये रोखठोक वक्तव्य केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर आधारित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले की, मराठी माणसांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करणाऱ्या अभिनव अश्या “मराठी कट्ट्याची सुरुवात आज होत आहे. मुंबईत जिकडे मराठी मन आहे तिकडे हा कट्टा आयोजित करण्यात येणार असून थोर विचारवंतांचे विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहचवण्याचे हे उत्तम व्यासपीठ असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कार्यक्रमात पाऊस सुरू झाला आणि कार्यक्रम अन्यत्र हलवावा लागला. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सावरकरांचा कार्यक्रम आहे तेव्हा विघ्न येणारच. जन्मापासून मरणापर्यंत त्यांना असाच संघर्ष करावा लागला. त्यामुळे क्रांतिकारकांचे प्रेरक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांचे योगदान आपण अमान्य करू शकत नाही. संपूर्ण भारत पेटून उठतो आहे. ही प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे मिळाली.

पुढे बोलताना देवेंद्रजी म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्य मिळावे याकरिता ज्या यातना भोगल्या आहेत त्या “माझी जन्मठेप” या पुस्तकातून आपण जेव्हा वाचतो तेव्हा अंगावर अक्षरशः रोमांच  उभे राहतात. एका व्यक्ती मध्ये इतकं तेज कसं असू शकतं, यावर विश्वास बसत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले,  हरप्रकारे छळले. खडय़ा बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला जुंपले, नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांनी एक दिवस अशा कोठडीत राहून तरी दाखवावं.

 

हे ही वाचा:

… म्हणून ऐरोली खाडीतले मासे मृत पावले!

लग्नाच्या मंगल कार्यालयात सुरू होते हे ‘अमंगल’ कार्य!

‘बंदमुळे भाज्या, फळे नासली; ३०० ट्रक माल पडून राहिला’

‘साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही, आज शेतकरी खरा भिजला आहे’

 

याप्रसंगी मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा,  मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर, मुंबई महामंत्री अमित साटम, आमदार आशिष शेलार, आमदार  राहुल नार्वेकर, आमदार नितेश राणे, आमदार सुनिल राणे त्याचबरोबर भाजपा नेते, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई भाजप ‘मराठी कट्टा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव बर्वे यांनी केले तसेच सतीश भिडे, उत्तम काळे, शैला सामंत, वसंत बर्वे , नितीन कार्यकार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल आपले विचार मांडले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा