सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…

सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…

गोव्यात काँग्रेसचे नेते रवी नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. गोव्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने नाईक यांचा भाजपा प्रवेश झाला. त्यानिमित्त कार्यक्रमात भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  म्हटले की, लोकांचं भलं करू शकतील असे नेते भाजपात येत आहेत. ५० वर्षे लोकांची सेवा करणारे बहुजनांचे नेते रवी नाईक यांनी मोदीजींवर, गोवा मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपली घोषणा बदलली आहे. आता ती २२ प्लस नाही तर २७ प्लस आहे.

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, गोव्यातील राजकारणात खूप बदल होत आहेत. लग्न असलं की, काही लोक असे असतात जे बाजा वाजायला लागला की नाचायला लागता. गोव्यात अशा काही पार्ट्या असतात जे नंतर ते गायब होतात. सायबेरियात खूप बर्फ पडतो. त्यामुळे पक्ष्यांना खायला मिळत नाही. त्यावेळी हे पक्षी भारतात येतात. काही पक्ष आणि पक्षी भारतात तयार झालेत जे सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे गोव्यात येतात आणि निवडणुका झाल्या की कोलकात्याचा पक्ष कोलकात्यात आणि दिल्लीतला दिल्लीत. उद्या गोव्याचे पक्ष निर्माण झाले तर दिल्ली, कोलकात्याचा पक्ष नसेल तर गोव्याचे प्रमोद सावंत असतील. रवी नाईक असतील, सदानंद शेठ असतील बाबु पडळकर असतील.

हे ही वाचा:

विंटर ऑलिम्पिकवर अमेरिकेचा बहिष्कार

शिवसेनेचे यूपीएच्या दिशेने पहिले पाऊल

नवाब मलिक यांना न्यायालयाने फटकारले

राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; पोस्टरवरून फोटो गायब

 

कोलकात्याचा हा पक्षी आला आहे तो बॅगा घेऊन आला आहे. त्याने दुकान घातले आहे. आमच्याकडे या आणि माल घेऊन जा. राजकारणात दुकान टाकलं आहे. एमजी पक्षाला सांगू इच्छितो. तुम्ही पर्सकरता आकर्षित झाला तर लोकांचे शिव्याशाप (कर्स) मिळतील.

Exit mobile version