संजय राऊतांना फार सिरियसली घेऊ नका. रोज सकाळी कॅमेरापुढे उभे राहून लोकांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टीपासून दूर न्यायचे. अनावश्यक गोष्टींची चर्चा करायची. एकदा तरी शेतकरी, पूर, विजेचे कनेक्शन, गावं अंधारात यावर ते बोलले का? अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. टीव्ही ९ वर झालेल्या मुलाखतीत त्यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका करतानाच महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेवरही भाष्य केले.
ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली नाही हे महत्त्वाचे आहे. छोट्या राज्यांनीही शेतकऱ्यांना मदत केली. पण या सरकारने बार मालकांचे परवानगी शुल्क कमी केले. सरकारचे प्राधान्य कशाला आहे कळत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
ईडी, सीबीआयच्या कारवायांबद्दल फडणवीसांना विचारल्यावर ते म्हणाले की, अनिल देशमुखांचा विचार आपण करू. देशमुखांच्या विरोधात पत्र कमिशनरने दिले. न्यायालयाने सीबीआय चौकशी लावली. महाराष्ट्रात तर सीबीआयला सरकारने बंदी घातली आहे. तुम्ही जर साफ आहात तर चिंता कसली? हजारो कोटी रुपयांची संपत्ती कशी सापडते? ५०० कोटींचे हस्तांतरण कसे सापडते. याचे उत्तर देत नाहीत. कुणीही केला तरी भ्रष्टाचार लपवता येणार नाही.
फडणवीस म्हणाले की, सोमैय्यांनी आरोप लावला तो खोटा निघाला का, काळ्या पैशावर कशी साम्राज्यं उभी राहिली ती चालू ठेवायची का? काळ्या साम्राज्याचे पुरावे मिळत असतील तर गप्प राहायचे का? आमच्या पक्षातील कुणी काही केले असेल तर पुरावे द्या, केंद्रीय यंत्रणेकडे पुरावे द्या. मी जे मलिकांवर आरोप केले त्याविषयी तक्रारी केल्या.
हे ही वाचा:
शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांची ‘कोरिओग्राफी’
मोहित कंबोज मानहानी प्रकरणात नवाब मलिकांना जामीन
या वयात ही परिस्थिती पाहावी लागल्याने निराशेतून पवारांचे ‘ते’ विधान
महसूल गुप्तचर संचालनालयाने आवळल्या आयफोन तस्करांच्या मुसक्या
मीडियाची एक गँग संजय राऊत यांच्याकडे!
दुर्दैवाने, पण मीडिया हा ट्रॅपमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या मूळ विषयावर बोलण्यास वेळच नाही. सकाळी मीडियाची एक गँग संजय राऊत यांच्याकडे तर दुसरी गँग आणखी कुणाकडे. भाजपा त्यावर उत्तर देते. कारण खोटं बोललं की खोटं आहे हे सांगावंच लागेल. नाहीतर खोटं खरं वाटायला लागेल.