अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय शरद पवारांशी चर्चा करूनच! पवारांचा डबल गेम!

देवेंद्र फडणवीस यांनी केला सनसनाटी गौप्यस्फोट

अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय शरद पवारांशी चर्चा करूनच! पवारांचा डबल गेम!

देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका सकाळी शपथग्रहण करत सरकार स्थापन करण्याचा केलेला प्रयत्न महाराष्ट्रात प्रचंड चर्चिला गेला. पण त्यामागील वास्तव समोर येत नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामागील खरे कारण रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अर्णब गोस्वामी यांच्यासमोर उघड केले आणि खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या मुलाखतीत या प्रकरणाचे वास्तव समोर आले.

 

देवेंद्र फडणवीसांना अर्णब यांनी या शपथग्रहणाबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, शरद पवारांची ‘मिस्ट्री’ समजण्यासाठी ‘हिस्ट्री’ समजली पाहिजे. ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी आमच्याशी नाते तोडले मुख्यमंत्री खुर्चीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेसशी बोलणी सुरू केली, तेव्हा उद्धव ठाकरे फोनही उचलत नव्हते. आम्हाला कळले की ते आमच्यासोबत येणार नाहीत. तेव्हाच राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितले की, त्यांचे काही लोक आमच्यासोबत येऊ इच्छितात आणि स्थिर सरकार आपण देऊ शकतो. मग आमची शरद पवारांच्या सोबत बैठक झाली. होय, शरद पवारांसोबत चर्चा झाली. त्यात हे निश्चित झाले की सरकार बनवता येईल. याची पद्धत निश्चित झाली. अजित पवार आणि मी हे सरकार स्थापन करू असे ठरले. तशी तयारी झाली. तयारी केल्यावर एक वेळ आली की, शरद पवार बाजुला झाले. शपथ घेण्यापूर्वी तीनचार दिवस आधी पवार बाजूला झाले.

 

मग अजित पवार यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. माझ्यासोबत येण्यासाठी अजित पवार आणि आम्ही शपथ घेतली. शरद पवारांनी यात पुढाकार घेतला होता. त्यामुळे शपथ घेतली की पवारही सोबत येतील, अशी अपेक्षा होती. पण ते आले नाहीत. मग आम्हाला आमचे सरकारचे प्रयत्न थांबवावे लागले. सरकार बनविण्याचा जो प्रयत्न केला होता तो पवारांशी बोलणी करूनच.

हे ही वाचा:

दिल्लीतील साक्षी हत्याकांड; आरोपी साहिलवर ६४० पानी आरोपपत्र!

‘रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण’ चोरी करणारे पोलिसांकडून ‘जेरबंद’!

आता न्यूयॉर्कमध्ये दिवाळीत शाळांना सुट्टी!

भारतीय लष्कराची क्षमता पाहून चीनला भरली धडकी, नियुक्त केले तिबेटी सैनिक

अर्णब यांनी यासंदर्भात विचारले की, पवारांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणता येईल का याला? की त्यांनी पुतण्याच्या पाठीत खंजीर खुपसला?

 

त्यावर फडणवीस म्हणाले की, मी दोन गोष्टी सांगतो. उद्धव ठाकरे यांनी केले ते खंजीर खुपसणे होते. कारण त्यांच्यासोबत आम्ही निवडणूक लढविली नव्हती. त्यांनी आमच्यासोबत स्ट्रॅटेजी केली. आमची दिशाभूल केली. दुहेरी खेळ केला. सुरा खुपसण्याचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी केला. पवारांनी मात्र डबल गेम खेळला. अजित पवार आणि मी सकाळी शपथ घ्यायला अचानक गेलो नाही. आम्हाला जबाबदारी देण्यात आली. पण नंतर चित्र बदलले.

Exit mobile version