तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका

तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका

‘तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका’ असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला लगावला आहे फडणवीस आजपासून अतिवृष्टी झालेल्या भागाचा तीन दिवसांचा दौरा करत आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

गेले काही दिवस राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागाला पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तीन दिवसांचा दौरा करत आहेत. आज हे दोघेही वाशिम, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.

हे ही वाचा:

मी स्वतः भारतीय लस घेतली आहे, यूएनजीए अध्यक्षांनी जगाला सांगितले

एलएसीचं रक्षण करायला ‘वज्र’ तैनात

शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार

दुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम!

फडणवीस आणि दरेकर हे बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. तर अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी देखील करत आहेत. यावळी शेतकरी आपली व्यथा या दोन्ही नेत्यांकडे मांडताना दिसत आहेत. मोझरी येथे सोयाबीनचे अतिप्रचंड नुकसान झाले आहे. तरी देखील अधिकारी पैसे घेतल्याशिवाय नुकसानभरपाई मिळणार नाही असे सांगत असल्याचे गार्‍हाणे शेतकरी मांडत आहेत. तर साहेब तुम्हीच काही तरी करू शकता असे म्हणत शेतकरी सरकार ऐवजी विरोधी पक्षाकडून अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहेत.

यावेळी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला असून ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असे आश्वस्त केले आहे. तर जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करण्यात येईल त्यांनी म्हटले आहे. आता शेतकऱ्यांची भावना त्यांचे सर्वस्व गेल्याची आहे. अशावेळी त्यांच्या सोबत उभे राहणे त्यांना धीर देणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तर स्थानिक प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

Exit mobile version