गेले काही दिवस वेदांता फॉक्सकॉनसंदर्भात जो गदारोळ महाराष्ट्रात सुरू आहे त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मॉस्कोला अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले फडणवीस भारतात परतल्यावर त्यांनी भाषणात बोलताना यासंदर्भात स्पष्ट आणि पारदर्शक भूमिका मांडली.
फडणवीस म्हणाले की, वेदांताचे प्रमुख अनिल अगरवाल यांनी याबाबत वस्तुस्थिती मांडली. ज्या दिवशी मी शपथ घेतली दुसऱ्या दिवशी सीईओ, एमआयडीसीला बोलावले. काय चाललंय विचारणा केली. तेव्हा वेदांता फॉक्सकॉनचा कल गुजरातकडे आहे असे सांगत यावर काय करायचे असे मला सांगण्यात आले. तर मी अगरवाल यांना फोन लावला. कारण माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. मी सांगितलं, गुजरातला का करताय हा प्रकल्प. गुजरातपेक्षा आम्ही जास्त सवलती देऊ. त्यांना पत्र लिहिलं. मी घरी गेलो.तेव्हा ते म्हणाले की, आम्ही ऍडव्हान्स स्टेजला आहोत. आता महाराष्ट्रात आम्ही परत येऊ शकत नाही. पण महाराष्ट्रातही गुंतवणूक करणार आहोत. फॉरवर्ड इन्टिग्रेशनमध्ये करू. अगरवाल यांनी आमचं सरकार येण्याआधीच त्यांचा निर्णय केला होता. पण आता ज्यांनी काहीच केलं नाही ते शहाणपण शिकवत आहेत. निश्चितपणे गुजरातच्या मागे तुमच्या काळात महाराष्ट्र गेला असेल पण येत्या २ वर्षात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे गेला नाही तर बघा. अर्थात, गुजरात हा काही पाकिस्तान नाही. तो आपला लहान भाऊ आहे. राज्याराज्यांत निरोगी स्पर्धा असते. पण तरीही महाराष्ट्राला नंबर वन करू.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरेंच्या पापामुळे कंपनी राज्याबाहेर गेली’
इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या किंमती होणार कमी
समाजवादी विचारसरणीने केली देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त
महाराष्ट्र उद्योगाकरता ओळखला जातो. देशातील औद्योगिक उत्पादनात आपला वाटा आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. आपल्या अडचणी आहेत त्या दूर करणे महत्त्वाचे.