विरोध पक्षनेत्यांना आमंत्रणच नाही
महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रण न दिल्यामुळे आता महाविकास आघाडीचे असे खालच्या स्तराचे म्हणजे चीप राजकारण चालले असल्याची टीका झाली आहे.
राज्यात सरकारच्या वतीने कोणताही उद्घाटन सोहळा होत असेल तर विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित केले जाते, पण इथे तो शिष्टाचार पाळण्यात आला नाही. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली होती. हा निर्णय आयोजकांनी का घेतला हे माहीत नाही. विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करायला हवे होते. या परंपरा कायद्याइतक्याच महत्त्वाच्या आहेत. हा काही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या घरचा कार्यक्रम नाही, मुलाचं लग्न नाही. त्यामुळे फडणवीस, दरेकर यांना आमंत्रण द्यायला हवे होते. मात्र यावरून महाविकास आघाडीची नियत कळली.
यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले. कोकणाच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या, मोदी सरकारच्या प्रयत्नाने साकारलेल्या चिपी विमानतळाचे उद्घाटन होत असले तरी त्यात विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांना मात्र आमंत्रण देण्यात आलेले नाही.
आज कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणाऱ्या, मोदी सरकारच्या प्रयत्नाने साकारलेल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन होतंय.
या कार्यक्रमाला विधानसभा व विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण न देऊन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे. pic.twitter.com/w7riFtxPlC— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 9, 2021
हे ही वाचा:
सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच
चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी होणार राजकीय उड्डाण?
उत्तर प्रदेशात अटक केलेल्या कलिम सिद्दीकीचे कसे चालते धर्मांतरण…वाचा
नारायण राणे यांनी यासंदर्भात फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती, पण या गोष्टीला फार महत्त्व देऊ नये, असे फडणवीस यांनी म्हटले होते. ते सहनशील आहेत पण मी तिथे असतो तर वेगळे चित्र दिसले असते, असे राणे म्हणाले.