देवेंद्र फडणवीसांनी जरांगेना दिले आव्हान!

फडणवीस हे आरक्षणातले अडथळा आहेत, असा केला होता आरोप

देवेंद्र फडणवीसांनी जरांगेना दिले आव्हान!

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. पण यावेळी अश्लाघ्य भाषेत टिप्पणी न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात बेबनाव असल्याचा आरोप केला. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना आव्हान दिले.

“एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासाठी थांबवत आहेत”, असा आरोप जरांगे यांनी केला. या आरोपावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच उत्तर देऊ शकतील, जर त्यांनी हे आरोप मान्य केले, तर मी राजकारणातून संन्यास घेईन. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. ते म्हणाले की, आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी घेतले. मी शिंदेंच्या पाठीशी भक्कमपण उभा राहिलो आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी सांगितलं की मराठा आरक्षणासाठी त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे, मी तो निर्णय होऊ दिला नाही, त्याचक्षणी मी राजीनामा देईन. तसेच राजकारणातून संन्यासही घेईन.

हे ही वाचा:

सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न आता पूर्ण करायचेय!

ममता बॅनर्जींची ठोकशाही, विरोधात पोस्ट करणाऱ्या विद्यार्थीनीला अटक !

बलात्कार पीडितेचे पालक संतापले! म्हणाले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील विश्वास उडाला

लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?

त्यावर जरांगे म्हणाले की, राजीनामा देत असाल तर आधी सग्यासोयऱ्यांना आरक्षण द्या. फडणवीस हे राजीनामा देत आहेत म्हणजे हताश झाले आहेत. जरांगे त्याआधी, म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचं आहे, मग सगेसोयरे असेल किंवा आरक्षण असेल पण देवेंद्र फडणवीस हे ते होऊ देत नाहीत असा मनोज जरांगे यांचा आरोप आहे.
एकनाथ शिंदे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं.

मराठा समाजाला आरक्षण देताना, मी , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसलो होतो. आम्ही विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. आपण मराठा आरक्षणाचा जो कायदा केला, त्यात देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका होती. न्यायाधीश शिंदे समिती आपण नेमली, मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठवाड्यात आपण कुणबी प्रमाणपत्रही देण्यास सुरुवात केली. ज्या सवलती होत्या, तेही देण्याचं काम केलंय. आम्ही मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास विरोध करण्यासाठी न्यायालयात कोण गेलंय, हेही अगोदर पाहावे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं होतं. त्यावेळीही मी मंत्री होतो, त्या समितीमध्ये होतो, त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतात असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामध्ये, कुठलंही तथ्य नाही, हा खोटा आरोप आहे.

Exit mobile version