देवेंद्र फडणवीस यांनी विचारला सवाल
केंद्राचा पेट्रोल-डिझेलवर कर आहे १९ रुपये आणि महाराष्ट्राचा २९ रुपये मग महाराष्ट्रात महागाईवरून ओरड का सुरू आहे, असा सवाल विचारत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान केले. भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव वाढ झाल्यावरही केंद्र सरकारने दोनवेळा पेट्रोलचे भाव कमी केले. केवळ एक्साईज कमी केला असे नाही. एक्साईजचे जे पैसे मिळतात त्यातील ५१ टक्के केंद्राला आणि ४९ राज्याला पाठवले जातात. दोनवेळेला पेट्रोल डिझेल भावात घट करण्यासाठी २ लाख २० हजार कोटी रुपये नुकसान सहन केले आहे. सामान्य माणसाला पेट्रोल डिझेल कमी भावात मिळविण्याचा विचार केला. पण महाविकास आघाडीचे सरकार मे महिन्यात लोकांना एप्रिल फूल बनवत आहेत.
हे ही वाचा:
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार
ओबीसी आरक्षण गेले हे महाविकास आघाडीचे पाप!
वराला टक्कल असल्याचे समजताच वधूने लग्न करण्यास दिला नकार
जम्मू काश्मीर पोलिस पदकावरील शेख अब्दुल्लांचे चित्र हटवले; आता अशोकस्तंभ दिसणार
फडणवीस म्हणाले की, काँग्रेसच्या नाना पटोलेंना माझा सवाल आहे, अजित पवारांना सवाल आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल आहे की, पेट्रोल डिझेलच्या किमतीवर टाहो फोडता. केंद्राचा टॅक्स आहे १९ तर राज्याचा २९ रुपये. राज्याच्या टॅक्सपेक्षा केंद्राचा टॅक्स १ रुपया जास्त असायचा. मग महागाई कुणामुळे. वाढत्या पेट्रोल दराला १९ रुपये टॅक्स लावणारे की २९ रुपये लावणारे जबबादर आहेत? पण हे बेशरम आहेत. केंद्राने महागाई वाढवली. अशी ओरड करतील.
फडणवीस यांनी आवाहन केले की, माझी विनंती आहे भाजपा नेत्यांना की केवळ महाराष्ट्र सरकारमुळे महागाई आहे हे दाखविण्यासाठी आंदोलन केले पाहिजे. या खोटारड्यांना अद्दल घडविली पाहिजे ही अपेक्षा आहे.