सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते आहे का?

सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते आहे का?

देवेंद्र फडणवीस यांनी केला हल्लाबोल

अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, राठोडांचा राजीनामा घेतला तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? दाऊदच्या इशाऱ्यावर सरकार चालते का हा आमचा सवाल आहे. तुम्ही राजीनामा घेतला नाही तरी संघर्ष करणारच. याठिकाणी देशभक्त बसले आहेत. हे संघर्ष करतील. हा मोर्चा तर सुरुवात आहे. संघर्ष देशद्रोह्यांशी व्यवहार करणाऱ्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत संघर्ष. आम्ही षडयंत्र उघड केलं. मुद्दही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे होता है, अशा शब्दांत भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

ते म्हणाले की, मोदींजींना संपवू शकला नाहीत करोडो लोकांचे आशीर्वाद होता. ते वैश्विक नेते झाले. त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आमचे संबंध गुन्हेगारांशी नाहीत. तेव्हा षडयंत्र केलं तरी हे षडयंत्र उघड पाडू. अनेक बॉम्ब आम्ही ठेवलेत त्या वेळी ते येतील. ते बॉम्ब फोडल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनीनो संघर्ष सुरू झाला आहे.

हे ही वाचा:

मलिकांवर आरोप गंभीर, तरी पाठीशी पवार खंबीर

नवाब मलिकसारखी व्यक्ती मंत्रिमंडळात होती, याचे बाळासाहेबांना काय उत्तर देणार?

सरकारी वकिलांचे कार्यालय की राजकीय कत्तलखाना!

फडणवीसच तुमचा बाजार उठवतील!

 

मोर्चा निघेल. पोलिसांशी संघर्ष करायचा नाही. मोर्चा अडवला तरी अटक केली तर अटक करा. आम्हाला अटक केली तर गडबड करू नका. बारावीची परीक्षा आहे, परीक्षार्थींना आंदोलनाने त्रास होता कामा नये. जे निर्देश देतील त्याप्रमाणे काम करायचे आहे. राजीनामा दिला नाही तर हा संघर्ष तीव्र होईल. संघर्ष झाकी है पिक्चर अभी बाकी है. बिकने का तो सवालही नही उठता, हम शिवाजी महाराज के मावळे है, अशा शब्दांत फडणवीस यांनी इशारा दिला.

Exit mobile version