30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारण'गोपीचंद पडळकर प्रकरणात पोलिस अधिकारी सामील'

‘गोपीचंद पडळकर प्रकरणात पोलिस अधिकारी सामील’

Google News Follow

Related

देवेंद्र फडणवीस यांनी केला आरोप

भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप रविवारी केल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उमटले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात घणाघात केला की, या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकारी सामील आहेत. जर पोलिसच सदस्याच्या हत्येचा कट रचत असतील तर काम कसे करायचे? गोपीचंद मुंडे पवारांवर आरोप करत पण मुंडेंवर हल्ला झाला तेव्हा मुंडेंना सुरक्षा दिली. भुजबळांनाही सुरक्षा दिली होती. मात्र गोपीचंद पडळकर संपला पाहिजे, अशी अवस्था होत असेल तर लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. ज्यांनी याप्रकरणी ३०७ कलम लावले त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ज्यांनी एन्ट्री घेतली त्यांना निलंबित करा. या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली व्हायला हवी. नाहीतर सभागृहात काम करणे मुश्किल होईल.

फडणवीस म्हणाले की, सत्तापक्षाचे कार्यकर्ते विरोधी पक्षाच्या सदस्याचा मुडदा पाडायला बघत असतील तर हे चिंताजनक आहे. सत्तापक्षाचे लोक म्हणतात कशाला सुरक्षा घेता? पोलिस त्यांच्या बापाचे आहेत का, सरकारचे पोलिस आहेत. विरोधात बोललो तरी जीव वाचविण्याची जबाबदारी सरकारची आहे. या महाराष्ट्राला बंगाल करू नका. अशाप्रकारे राजकीय हत्या होऊ देऊ नका.

फडणवीसांनी यासंदर्भात बैठक घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा बैठक घ्या. पोलिसांवर कारवाई करा. ३०७चा खोटा गुन्हा दाखल केला तो मागे घ्या. अध्यक्ष महोदय आपल्या दालनात आम्हाला बोलवा. आम्ही शांत बसू शकत नाही. कामकाज थांबवा आणि पहिल्यांदा यावर निर्णय करा. सरकारने अशा पद्धतीने वागायचे नसते. पोलिस जर असे वागत असतील या सदनाचे कामकाज थांबवून जीविताचा प्रश्न आहे. यासंदर्भातला निर्णय़ झाला पाहिजे.

हे ही वाचा:

नितेश राणेंचे निलंबन करण्याची मागणी

नितेश राणे यांच्या अटकेची मागणी

विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

सनी लिओनीच्या त्या गाण्यात होणार बदल

 

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेली ३० वर्ष मला महाराष्ट्र ओळखतो. मी कुणाच्या अध्यात नसतो, मध्यात नसतो मी चार दिवसांत राज्य विकणार असे म्हणतात. काय बोलता? सत्ताधारी व सन्माननीय आपण पण तारतम्य ठेवून वागले पाहिजे, बोलले पाहिजे. आरोप प्रत्यारोप चालतातच.  सदस्यांना संरक्षण देण्याची भूमिका आहेच. याबाबत शंभूराजे देसाईंशी बोललो. सदस्य सुरक्षा नको म्हणतात तरी आम्ही लक्ष घालू. योग्य ती कारवाई केली जाईल.

गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबद्दल हे वक्तव्य केले होते. त्यावरून अजित पवार यांनी सदर वक्तव्य केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा