…असा हल्ला करण्याची हिंमत होता कामा नये!

…असा हल्ला करण्याची हिंमत होता कामा नये!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला संताप

ठाणे येथे फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात पालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली. त्यावर विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चीड व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, ही अत्यंत दुःखदायक आणि वाईट अशी घटना आहे एकप्रकारे संताप आणणारी घटना आहे अशा व्यक्तीवर कारवाई व्हायला हवी. हल्ला करण्याची अशी हिंमत होता कामा नये. पण ज्या अधिकाऱ्यांवर हा हल्ला झाला त्यांनी त्या परिस्थितीतही जी जिद्द दाखविली त्याचे मी कौतुक करू इच्छितो. परंतु त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे.

यासंदर्भात भाजपा उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.  त्या भेटीनंतर ट्विट करताना चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, कल्पिता पिंपळे कर्तव्यावर असताना त्यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला करत त्यांची बोटे छाटली. हे लिहितानाही जीवाचा थरकाप होतोय. सुदैवाने अंगरक्षक पालवे बचावले. पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते. इथे कायदाराज नाही, गुंडाराज सुरू आहे.

अंगरक्षक पालवे यांचीही चित्रा वाघ यांनी भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला.

हे ही वाचा:

कोरोना चाचणी अहवालासाठी धावताहेत चाकरमानी

करायचे तरी काय? कोरोना चाचणी आधी पॉझिटिव्ह; मग निगेटिव्ह

जितेंद्र आव्हाड बारावा खेळाडू

काश्मीरही काफ़िरांपासून ‘मुक्त’ करा

पिंपळे या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या असताना एका फेरीवाल्याने सुरा घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. तो हल्ला उडवताना त्यांची बोटे छाटली गेली. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली.

Exit mobile version