भास्कर जाधव यांनी नौटंकीनंतर अंगविक्षेप मागे घेतले!

भास्कर जाधव यांनी नौटंकीनंतर अंगविक्षेप मागे घेतले!

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या अंगविक्षेपावर विधानसभेत गदारोळ झाला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहातील वातावरण चांगलेच तप्त झाले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर जोरदार आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांना माफी मागण्यास सांगितले. तेव्हा आपण अंगविक्षेप मागे घेत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. भास्कर जाधव यांच्या नकलांची नौटंकी आणि त्यानंतर अंगविक्षेप मागे घेण्याचे वक्तव्य यामुळे सभागृहात चांगलाच राडा झाला. शेवटी अध्यक्षांनी सभागृह दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंगविक्षेप कसे काय मागे घेता येऊ शकतात? अंगविक्षेप मागे घेत असल्याचे जाहीर करून एकप्रकारे त्यांनी अंगविक्षेप केल्याचे मान्यच केले आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. हा देशाच्या नेत्यांचा अपमान आहे. भास्कर जाधवांना यासाठी लाज वाटायला हवी. असा अवमान कदापिही मान्य होणार नाही. अध्यक्ष महोदय आपणही ते सहन करू नये. अवमान करणाऱ्या सदस्यांना बसण्याची संधीही देऊ नये. हात जोडून विनंती. आमचा आक्षेप पंतप्रधानांचा अंगविक्षेप करून भास्कर जाधव बोलले आहेत हा आहे. त्यांनी त्याबद्दल माफी मागितली पाहिजे.

अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचे वक्तव्य तपासून पाहिले जाईल, असे आश्वासन दिले. त्यावर फडणवीस म्हणाले की, हा देशाच्या नेत्यांचा अपमान आहे आणि त्याचा फक्त तपास करून कसे चालेल?

त्याआधी, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी १५ लाखांच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. त्यावरूनही गदारोळ झाला.

हे ही वाचा:

सुकेश चंद्रशेखर विरुद्ध नोरा फतेही देणार साक्ष?

हिवाळी अधिवेशनात विधानसभेला मिळणार नवे अध्यक्ष महोदय?

‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’…विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू रवींद्र वायकरांची ईडीकडून ८ तास चौकशी

 

त्यावर जयंत पाटील यांनी याचा तपास करा तोपर्यंत सभागृह चालू द्या असे म्हटल्यावर फडणवीस म्हणाले की, तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात. तुम्हीच अशा कृत्याचे समर्थन कसे काय करत आहात? तेव्हा जयंत पाटील म्हणाले की, मी अंगविक्षेप पाहिले नाहीत. पण जे रेकॉर्डला आहे त्याची तपासणी करावी अशी माझी मागणी आहे.

अध्यक्ष म्हणाले की, जे सभागृहात उपस्थित नाहीत, राष्ट्रीय नेते आहेत त्यांची नक्कल करणे योग्य नाही.

Exit mobile version