‘वसूलीखोर ठाकरे सरकार हे उद्योग विरोधी आहे.’ असा आरोप करत भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ऑगस्ट महिन्यातील जीएसटी कलेक्शन हे जुलै महिन्यापेक्षा तब्बल ३७२८ कोटी रुपयांनी कमी झालं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वतःच वारंवार टाळेबंदी होईल असं सांगत फिरतात आणि कोरोनाच्या धोरणांसंदर्भात अनिश्चितता पसरवतात, ज्यामुळे उद्योगधंद्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्याचबरोबर महावसूली सरकार हे उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात वसूली करत असल्यामुळे नवे उद्योग येणं तर सोडाच पण आहेत ते उद्योग महाराष्ट्रात टिकून राहणं हे कठीण झालं आहे. आर्थिक आघाडीवर ठाकरे सरकारवर अनेक आरोप करत अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारला घेरले आहे.
भाजपा मुंबई प्रभारी,आमदार अतुल भातखळकर यांची पत्रकार परिषद. https://t.co/zicIQmTzWN
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 3, 2021
“केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना सांगितलं की महामार्गाच्या कामात सत्ताधारी पक्षाकडून (शिवसेना) कामात अडथळे आणले जात आहेत आणि खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न होत आहे. ठिकठिकाणी ठाकरे सरकारच्या काळात खंडणी वसूल केली जात आहे, उद्योजकांना धमकावलं जात आहे. एमआयडीसीमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. उद्योजकांना जमीन हवी असेल तर कुठल्यातरी हॉटेलमध्ये भूषण देसाई नामक व्यक्तीला भेटावं लागतं. त्याशिवाय कामं होत नाहीत.” असं भातखळकर म्हणाले.
हे ही वाचा:
पॅरालिम्पिक २०२०: प्रवीण कुमारने विक्रमी कामगिरी करत पटकावले रौप्य पदक
२०२५ पर्यंत होणार क्षयरोग मुक्त भारत
रशियाच्या ‘झापड’ मध्ये भारताचा सहभाग
देशात सर्व राज्यांमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये वाढ होत असताना महाराष्ट्रातच जीएसटी कलेक्शनमध्ये घट का होत आहे? महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये ठाकरे सरकारच्या वसूलीखोर धोरणामुळे उद्योगधंदे रसातळाला जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना विश्वास द्यावा की तुम्हाला इथे निर्भयपणे, प्रामाणिकपणे काम करता येईल. तरच राज्याचा आर्थिक गाडा सुधारेल. ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही तर आम्ही या बाबत आंदोलन करू.” असा इशाराही भातखळकरांनी दिला.