एपीएमसीमधेही वसुली सुरु

एपीएमसीमधेही वसुली सुरु

एकीकडे राज्यभरात कोरोनाशी लढा सुरु आहे, तर दुसरीकडे नवी मुंबईतील कृषीउत्पन्न बाजार समिती, एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये संचालकांचा अजब कारभार सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. या ठिकाणी बाजार समितीला उघडपणे आव्हान देत कामगारांकडून ओळखपत्रासाठी पैसे घेण्याचे प्रकार सुरु आहेत. विशेष म्हणजे २ दिवसांपूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत महापालिका आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. असं असताना देखील ओळखपत्र देण्याचा कारनामा भाजीपाला मार्केट आवारात करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीला आव्हान देणाऱ्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

बाजार समितीच्या नाकावर टिच्चून ओळखपत्रासाठी कामगारांकडून दोनशे रुपये घेण्याचं परिपत्रक काढण्यात आलंय. या प्रकाराने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे बाजार समितीची मोठी बदनामी होत आहे. अशाप्रकारे पैसे घेऊन ओळखपत्र देण्याचे प्रकार घडू नये म्हणून एपीएमसी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. शिवाय सुरक्षा रक्षकांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस

मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी

गुजरातचे पत्र दाखवता, मग महाराष्ट्राचे का लपवता?

… कारण ठाकरे सरकार निकम्मे आहे!

अँटीजेन चाचणी तपासणी ज्यांनी केली असेल त्यांना मोफत ओळखपत्र मिळणार आहेत. त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नयेत, असे थेट आवाहन बाजार समिती प्रशासन करत आहे. दुसरीकडे ओळखपत्राला पैसे आकारले जात असल्याने मजुरांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजीपाला मार्केटच्या संचालकांनी काही दिवसांपूर्वी ओळखपत्राला दोनशे रुपये घेणार असल्याचा मेसेज पाठवला होता. पैसे घेऊन ओळखपत्र देण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करण्यात आली. यावेळी संचालकांच्या ए विंगमध्ये लेटरहेड घेऊन आलेल्या लोकांना पैसे देऊन ओळखपत्र वाटप सुरु असल्याचं दिसून आलं.

Exit mobile version