वरूण देसाईंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सचिन वाझेंची वकिली?

वरूण देसाईंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सचिन वाझेंची वकिली?

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकाचं नाव घेत थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्ला चढवला आहे. या सगळ्या प्रकरणात खंडणीचा मुद्दा उपस्थित करत नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचं रॅकेट चालतं. या सगळ्या बेटिंगवाल्यांना सचिन वाझे यांनी फोन केला होता आणि त्यांच्याकडे मोठ्या खंडणीची मागणी केली होती, असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. सचिन वाझेंकडून बेटिंगवाल्यांना धमकावण्यात आलं. त्यांच्यावरील छापा किंवा अटक टाळायची असेल तर तुम्हाला दीडशे कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. सचिन वाझे यांनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांचा फोन जातो. तुम्ही बुकींकडे जे पैसै मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असं सरदेसाई यांनी वाझेंना विचारल्याचा म्हणजे एकप्रकारे खंडणी मागितल्याचा आरोप राणेंनी केला आहे. या प्रकरणात आता थेट वरुण सरदेसाई यांचं नाव आल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

हे ही वाचा:

विरोधकांकडून सरकारवर निशाणा

सचिन वाझे यांचे निलंबन

मराठा आरक्षणावर सुनावणीला सुरूवात

नाणारला तळा अथवा जयगडचा पर्याय

नितेश राणे यांनी फक्त आरोपच केला नाही. तर वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्ड, त्यांचं संभाषण तपासण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. वरुण सरदेसाई यांच्या कॉलचे सीडीआर एनआयएने तपासावे असे नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांना दिलेल्या वाय प्लस सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच वरुण सरदेसाईला सचिन वाझेंना फोन करण्याचा अधिकार कुणी दिला? आपल्या नातेवाईकाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री सचिन वाझेला पाठीशी घालत आहेत का? असा सवाल राणेंनी विचारला आहे.

Exit mobile version