आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

दिल्ली वक्फ बोर्ड मनी लाँडरिंग प्रकरणी न्यायालयाचा निर्णय

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

दिल्ली वक्फ बोर्ड मनी लाँडरिंग प्रकरणी आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वक्फ बोर्ड प्रकरणी आमदार अमानतुल्ला खान यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत आमदार अमानतुल्ला खान यांच्या कोठडी वाढ केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांना सक्तवसुली संचालनालयाने २ सप्टेंबर रोजी अटक केली होती.

आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरावर ईडीने छापेमारी करत त्यांना अटक केली. दिल्लीतल्या कथित वक्फ घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. अमानतुल्लाह खान हे आम आदमी पार्टीचे आमदार असून दिल्लीतल्या ओखला या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. दिल्ली वक्फ बोर्डाच्या संचालक पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला त्याचा तपास ईडीकडून केला जात आहे.

हे ही वाचा : 

अमेरिकेत मोदींच्या भाषणादरम्यान श्रोत्यांना काशी मथुरेच्या मंदिरांची आठवण

भारताचा कायापालट करून डिजिटल इंडियाचे नरेंद्र मोदींचे लक्ष्य

प्रसादामधील पवित्र्यासाठी तिरुमला येथे ‘महा शांती होमम’चे आयोजन

अमेरिका- इंडिया ही नव्या जगाची ‘एआय’ शक्ती

अमानतुल्ला खान विरुद्ध ईडीचा खटला २०१८ ते २०२२ दरम्यान बेकायदेशीररीत्या कर्मचाऱ्यांची भरती आणि वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर अन्यायकारकपणे भाडेतत्त्वावर दिल्याच्या आरोपांवर आधारित आहे. याचा परिणाम म्हणजे बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा त्यांना झाला आहे. ईडीने या प्रकरणा संदर्भात अमानतुल्ला खान यांची १२ तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती. ईडीने दावा केला आहे की, या बेकायदेशीर कृत्यांमधून अमानतुल्ला यांनी मोठी रक्कम मिळवली असून यातून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावे स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, दिल्ली उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांकडून वारंवार समन्स चुकवल्याचा दाखला देत मार्चमध्ये अमानतुल्ला खान यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना अटकेपासून संरक्षण नाकारले होते. १८ एप्रिल २०२४ रोजी ईडीने अमानतुल्ला खान यांची तब्बल १३ तास चौकशी केली होती आणि नंतर त्यांना अटक झाली होती.

Exit mobile version