काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांची पक्षातून हकालपट्टी

सहा वर्षांसाठी केली कारवाई

काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांची पक्षातून हकालपट्टी

राज्यात कधीही विधानसभा निवडणुका जाहीर होतील अशी परिस्थिती असून यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे. अशातच विधानसभा निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या तोंडावर काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने अमरावतीमध्ये शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी आमदारावर मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांची काँग्रेसने सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त समोर आले आहे.

एएनआयने काँग्रेस प्रदेश कमिटीचे पत्र शेअर केले असून यामध्ये म्हटले आहे की, आमदार सुलभा खोडके यांच्याविरोधात २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतरही सतत पक्षविरोधी काम केल्याच्या अनेक तक्रारी प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलाजी यांच्या निर्देशावरून अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या पत्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही आहे.

हे ही वाचा :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अथक परिश्रमाचं राज ठाकरेंकडून कौतुक

लोकसभेच्या पराभवाने नाराज नाही, थकले नाही, आपल्याला आपला डाव खेळायचाय!

लुंगी, ब्लँकेटचा वापर करून पाच कैदी २० फुटी भिंत चढून फरार!

छत्रपती शिवाजी महाराजांनी उठाव केला होता, आम्हालाही करावा लागेल !

यापूर्वी हरियाणामध्येही निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पक्षांतर्गत कारवाई करण्याचा धडाका लावला होता. अनेक नेत्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपावरून पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी अशीच मोहीम उघडणार का अशी चर्चा सर्वत्र आहे.

Exit mobile version