ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या लॅविश राहणीमानासाठी करोडोंचा खर्च

ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या लॅविश राहणीमानासाठी करोडोंचा खर्च

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालय आणि घरातील झगमगाटावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी वाढीव वीज बिल आणि नंतर वीज तोडणीवरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा हा नमुना पहा असे म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्वीटरवरून “आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा एक नमुना… हे घर आणि कार्यालय आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं. या ऐषोरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब, शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी.” अशा शब्दांत ठाकरे सरकारवर टिका करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

युपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊतांनी पुन्हा उचलली पवारांची तळी

पवारांनी घेतली वाझे प्रकरणाची माहिती

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आक्रमक

याबाबत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील दोन ट्वीट करत नितीन राऊतांना लक्ष्य केले आहे. अतुल भातखळकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असतो पण ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यालय व घराचे सुशोभीकरण करताना सढळ हाताने पैसा खर्च केला जातो… जनतेला भरमसाठ वाढीव बिले यासाठीच पाठविली आहेत का?’

त्यानंतर नितीन राऊत यांनी पायलट होतो त्यावेळ लॅविश रहायचो असे म्हणून सारवासारव करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. त्यावर देखील अतुल भातखळकर यांनी ‘हा करोडोंचा खर्च खिशातून केला की सरकारी तिजोरीतून ते सांगा असे म्हटले आहे.’

एका बाजूला शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना अवाच्या सवा वीज बिले पाठवली आहेत. त्या वीज बिलांची सक्तीने वसुली केली जात आहे अन्यथा वीज जोडणी कापण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ऊर्जामंत्र्यांच्या कार्यालय आणि घराच्या झगमगाटासाठी करोडो रुपयांचा खर्च केला गेला असल्याने विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

Exit mobile version