ठरलं… मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघाला

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली माहिती

ठरलं… मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघाला

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाऊन आले की मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होत असे. गुरुवारी रात्री शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीला जाऊन आले त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय निघताच देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट वक्तव्य केले आहे.

जुलै महिन्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात दिल्लीला जाऊन भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेकवेळा त्यासंदर्भातील बैठकाही असतात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारही करायचा आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतीलच. जुलै महिन्यात आम्ही विस्तार करू,” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

“केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा आपआपसात काहीही संबंध नाही. केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे आम्हाला माहितीही नाही. आम्हाला राज्याच्या विस्तारात जास्त रस आहे,” असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:

भारत- पाक सामन्यासाठी हॉटेलचे दर गगनाला भिडले

अमेरिकेतील कॉलेजांमधील आरक्षण बंद

३६५ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या सरकारचा ट्विस्ट आणि टर्न्सचा प्रवास कसा होता?

चालत्या गाडीवर झाड कोसळून सहायक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

“ज्याला बातमी मिळाली नाही तो या मंत्र्यांना काढणार, त्या मंत्र्यांना घेणार अशी एक बातमी तयार करतो आणि सोडतो. अशा बातमीला कोणतीही विश्वासार्हता नाही. जुलै महिन्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल. इतर कुणी इतकं स्पष्टपणे बोलत नाही,” असंही देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आलेल्या बातम्यांवर उत्तर दिलं.

Exit mobile version