मिलिंद देवरा यांचे काँग्रेसमधून निघणे हा राहुल गांधी यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. गांधी वंशजांच्या सुरुवातीच्या काळात ओळखल्या जाणाऱ्या तरुण ‘वंशजां’च्या मूळ गटाचे निर्गमन जवळपास पूर्ण झाले आहे.
जितिन प्रसाद आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर देवरा हे काँग्रेसच्या दुसऱ्या पिढीतील तिसरे नेते आहेत, ज्यांना यूपीए सत्तेच्या दशकभरात ‘टीम राहुल’म्हणून ओळखले जात होते. तर, प्रसाद आणि सिंदिया यांच्या प्रमाणेच आरपीएन सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांना अद्याप विधानसभेत जागा मिळालेली नाही. शेवटचे उरले आहेत ते सचिन पायलट.
सध्या काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य असणारे आणि एआयसीसीचे पदाधिकारी असणारे पायलट यांनी तीन वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये बंडखोरी करून पक्षाला हादरवून सोडले होते. देवरा यांची नुकतीच एआयसीसीचे संयुक्त खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सन २०१४च्या काँग्रेसच्या पडझडीनंतर देवरा हेही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. चार तरुण नेत्यांचे काँग्रेसला राम राम ठोकणे, म्हणजे तरुण नेत्यांना काँग्रेसमध्ये फारसे भवितव्य दिसत नाही व मोदी यांच्या काळात त्यांना उज्ज्वल भविष्य दिसते आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
खरे तर या दशकात काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’ त्यानंतर कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे पक्षाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र तरुण नेत्यांच्या जाण्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हे ही वाचा:
ट्रेनमध्ये पाणी गरम करण्यासाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटमध्ये लावली इलेक्ट्रिक किटली!
पतीच्या वाहनचालकाशी प्रेमसंबंध, पत्नीने स्वतःचे ‘कुंकू पुसले’
शरद मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक!
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केला प्लॉट!
मिलिंद देवरा हे गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होते. मात्र कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर ते थोडे शांत झाले होते. अखेर भाजपने हिंदी पट्ट्यातील राज्यात अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर सन २०२३च्या सुरुवातीला हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मिळालेले काँग्रेसचे यश झाकोळले गेले. त्यामुळे देवरा यांनी आपला अंतिम निर्णय घेतला.
काँग्रेस पक्षाने लोभाचा पुरावा म्हणून या सर्व पक्षनेत्यांच्या राजीनाम्यांचा उल्लेख केला आहे. ज्योतिरादित्य यांनी जेव्हा काँग्रेसला रामराम ठोकला होता, तेव्हा राहुल गांधी यांनी ज्या व्यक्तींना काँग्रेस सोडायची आहे, त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध विचारांची लढाई लढण्याला भीत आहेत, अशी टीका केली होती. मात्र अशा प्रकारे नेत्यांचे पक्षातून बाहेर पडण्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचते आणि ते ध्येयापासून विचलित होतात, याची चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरपासून सुरुवात होत असतानाच, मिलिंद देवरा यांचा राजीनामा आल्याने काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.