अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणि मला संपर्क करत आहेत. त्यांनी सांगितले आहे की, त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या नऊ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
येत्या ५ जुलै रोजी शरद पवार यांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच शरद पवार यांच्यासोबत असणारा, त्यांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. नऊ आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा:
शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते बडतर्फ
अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल!
खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट
विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?
ज्याक्षणी नऊ आमदारांनी शपथ घेतली त्याच क्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील, अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.