माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचा भाजपामध्ये प्रवेश

माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचा भाजपामध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. दिनेश त्रिवेदी यांनी १२ फेब्रुवारी रोजी तृणमूल काँग्रेसमधून आणि राज्यसभेतून राजीनामा दिला होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी आज पक्षप्रवेश केला.

पश्चिम बंगालच्या वर्तमान स्थितीत कोणताही बदल घडवून आणण्यासाठी राज्यसभेचे खासदार म्हणून आपली भूमिका अपुरी असल्याचे नमूद करत त्यांनी राजीनामा दिला होता. पश्चिम बंगालसाठी काम करण्याची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले होते. सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या राजकीय हिंसाचाराचाही त्यांनी निषेध केला होता.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जींना धक्का, या बड्या नेत्याचा राजीनामा…..

त्रिवेदींच्या प्रवेशावेळी नड्डा म्हणाले की, “(त्रिवेदी हे) चुकीच्या पक्षातील योग्य व्यक्ती होते. आता ते योग्य पक्षात आले आहेत.” तर दिनेश त्रिवेदी यांनी यावेळी ममता बॅनर्जींना टोला लगावत असे वक्तव्य केले की, ” मी विधानसभा निवडणूक लाढवो किंवा न लाढवो, मी बंगालच्या राजकारणात सक्रिय राहणार आहे.जनतेने तृणमूल काँग्रेसला नाकारलं आहे. जनतेला विकास हवाय, त्यांना भ्रष्टाचार आणि हिंसाचार नकोय. बंगाल खऱ्या परिवर्तनासाठी तयार आहे. राजकारण हा काही खेळ नाही, हा गंभीर विषय आहे. त्या (ममता बॅनर्जी) स्वतःचीच तत्व विसरल्या आहेत.

Exit mobile version