26 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरराजकारणदेवेगौडा येणार भाजपासोबत, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती

देवेगौडा येणार भाजपासोबत, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती

संयुक्त जनता दलामध्ये खळबळ

Google News Follow

Related

पुढील वर्षी कर्नाटकमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि जनता दल (संयुक्त ) हे पक्ष एकमेकांच्या ताकदीचा कसा फायदा घेऊ शकतात, याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी घेतील, असे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या तर्कवितर्कांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

 

भाजपचे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजप आणि जनता दल (संयुक्त) या दोन्ही पक्षांमध्ये निवडणूकपूर्व युती झाल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर दोन दिवसांतच देवेगौडा यांचे हे विधान आले आहे. त्यामुळे लवकरच ते युतीची औपचारिक घोषणा करू शकतात. ‘कर्नाटकात भाजप आणि जनता दल (सं) समसमान अटी-शर्तींवर सुरुवात करत आहोत. कुमारस्वामी आणि मोदी यांच्यातील अंतिम बैठकीनंतरच आम्ही कोणत्या जागा लढवू, याबाबत निर्णय घेतला जाईल’ असे त्यांनी सांगितले. ‘भाजपचे म्हैसूर, मंड्या आणि रामनगर येथे प्राबल्य आहे. तर, विजापूर, रायचूर आणि बिदरमध्ये आमच्या मतांशिवाय भाजपला लोकसभेच्या जागा जिंकता येणार नाहीत. उदाहरणार्थ, चिक्कबल्लापुरा येथे आमच्या २.८ लाख मतांशिवाय भाजप जागा जिंकू शकत नाही,’ असे देवेगौडा यांनी स्पष्ट केले.

 

 

देवेगौडा यांच्या वक्तव्यानंतर जनता दल (संयुक्त) पक्षातच मतांतरे आहेत. जनता दल (संयुक्त)चे गुरुमितकलचे आमदार शरणागौडा कंडाकूर यांच्या मते, ही युती प्रादेशिक पक्षाच्या भवितव्यासाठी योग्य नाही. ‘आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी अनेक मतदारसंघांत भाजपशी संघर्ष केला आहे, त्यांचा अशा कोणत्याही निर्णयामुळे गोंधळ उडेल,’ असे कंडाकूर यांनी स्पष्ट केले.

 

हे ही वाचा:

‘भारताने जी २० अजेंड्यांचे युक्रेनिकरण होऊ दिले नाही’

काँग्रेस खासदार शशी थरूर यांची मोदी सरकारवर स्तुतिसुमने

‘चिंतामणी’च्या मिरवणुकीत चोरट्यांचा जल्लोष

जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

‘अनेकजण त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी केवळ जनता दलावर अवलंबून आहेत. त्यांचे काय होणार? पक्षाध्यक्षांनी आमदारांची बैठक बोलावून त्यांची मते जाणून घेण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले. प्रादेशिक पक्षात सामील झालेले भाजपचे अनेक माजी आमदारही त्यांच्या भवितव्याबद्दल चिंतेत असल्याचे दिसून आले. ‘देवदुर्गातील करियम्मा आणि हग्रीबोम्मनहल्लीतील नेमराज नाईक असे आमचे आमदार भाजपमधून आले आहेत. भाजपला विरोध करून त्यांनी निवडणूक जिंकली. आता हे आमदार जनतेला कसे तोंड देणार?’असा प्रश्न एका नेत्याने उपस्थित केला.

 

 

देवेगौडा मात्र भाजपसोबत जुळवून घेण्याचे वेगळे कारण सांगत आहेत. जनता दल (संयुक्त) पक्षाला पद्धतशीरपणे संपवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. त्यामुळे पक्षाला वाचवण्यासाठी आम्ही भाजपशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण देवेगोडा यांनी दिले आहे. ‘भाजपच्या युतीमागील हेतू हा आमची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा किंवा सत्ता नसून कर्नाटकातील जनतेला काँग्रेसच्या गैरकारभारापासून वाचवणे, हा आहे,’ असे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा