माजी खासदार चंदन मित्रा कालवश

माजी खासदार चंदन मित्रा कालवश

राज्यसभेचे माजी खासदार आणि पत्रकार डॉ. चंदन मित्रा यांचं काल रात्री दिल्लीत निधन झालं. त्यांचा मुलगा कुशान मित्रानं यासंदर्भात माहिती दिली. मित्रा यांनी द पायोनियरचे संपादक म्हणूनही काम पाहिलं आहे. चंदन मित्रा भाजपाच्या  कोट्यातून राज्यसभेत पोहोचले होते. डॉ. चंदन मित्रा यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, “डॉ. चंदन मित्रा यांची ओळख ही कुशाग्र बुद्धी आणि दूरदृष्टी असणारी व्यक्ती अशी होती. त्यांनी माध्यमांसोबतच राजकीय विश्वातही आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्यानं दुःख झालं. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना संवेदना.”

भाजपा नेते आणि राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यानी चंदन मित्रा यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “१९७२ मध्ये शालेय सहली दरम्यान मी चंदन मित्रा यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत आहे. तू जिथेही असशील आनंदी राहा माझ्या मित्रा” आणखी एक ट्वीट करत त्यांनी लिहिलं की, “मी आज सकाळी माझा सर्वात जवळचा मित्र, द पायोनियरचे संपादक आणि माझी खासदार डॉ. चंदन मित्राला गमावलं. आम्ही शाळेपासूनच एकत्र होतो. आम्ही एकत्रच सेंट स्टीफंस आणि ऑक्सफोर्डमध्ये गेलो. आम्ही एकाचवेळी पत्रकारितेत सामील झालो आणि अयोध्या आणि भगव्या लाटेचा उत्सव अनुभवला.”

हे ही वाचा:

भारत ओव्हलवर ५० वर्षांचा इतिहास मोडीत काढणार?

‘क्लिन चीट’ रिपोर्टसाठी सीबीआय अधिकाऱ्याला देण्यात आली लाच!

सीएनएनला भारत सरकारची कृतीतून चपराक

अनिल देशमुखांचा जावई सीबीआयच्या ताब्यात

दरम्यान, डॉ. चंदन मित्रा पायोनियर वृत्तपत्राचे संपादक होते. २००३ ते २००९ पर्यंत राज्यसभेत ते खासदार होते. त्यांची २०१० मध्येही राज्यसभेसाठी निवड झाली होती. वर्ष २०१८ मध्ये त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. चंदन मित्रा लेखकही होते.

Exit mobile version