भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानथी श्रीनिवासन यांनी सोमवारी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. यात भाजपाच्या पुण्यातील नेत्या आणि कोथरूड विधानसभा क्षेत्राच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वानथी श्रीनिवासन यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून या कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
तामिळनाडूच्या आमदार असणाऱ्या भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानथी श्रीनिवासन यांनी सोमवारी आपल्या कार्यकारिणीची घोषणा केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सहमतीने ही घोषणा करण्यात आली. यात तीन राष्ट्रीय महामंत्री, सात राष्ट्रीय उपाध्यक्ष, सात राष्ट्रीय सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्ष, कार्यालयप्रभारी, मीडिया प्रभारी आणि सोशल मीडिया प्रभारी म्हणून प्रत्येकी एका व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.
Hearty Congratulations to all the newly appointed Office Bearers of @BJPMahilaMorcha.
I am confident that this team will raise the bar to newer heights and toil in carrying the Vision of PM @narendramodi Ji under the leadership of @JPNadda Ji and guidance of @blsanthosh ji. pic.twitter.com/gp9BslJMtJ— Vanathi Srinivasan (@VanathiBJP) June 21, 2021
हे ही वाचा:
१४ दिवसाचं अधिवेशन झालं तर ठाकरे सरकारला तेरवीची भिती
उत्तरप्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्यावर रासुका
ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ
यात पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना संधी देण्यात आली असून या कार्यकारणीत महाराष्ट्रातील त्या एकमेव एकमेव महिला आहेत. पुण्यातील एक सुशिक्षित राजकीय नेत्या म्हणून मेधा कुलकर्णी प्रसिद्ध आहेत. तर पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या अशीही त्यांची ख्याती आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. तर त्या आधी पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणूनही त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली होती.
या नवीन जबाबदारीसाठी मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तसेच राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्षा वानथी श्रीनिवासन यांचे आभार मानले आहेत. ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
@BJPMahilaMorcha उपाध्यक्षपदी पक्षाने दिलेल्या संधीबद्दल पंतप्रधान @narendramodi साहेब, मा. @AmitShah साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष @JPNadda जी, माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्षा आ. @VanathiBJP या सर्वांची ऋणी आहे. pic.twitter.com/cl0rCsYDVj
— Medha Kulkarni (@Medha_kulkarni) June 22, 2021