माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन

माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन झाले आहे. रविवार २५ एप्रिल रोजी दुपारी देवतळे यांनी अखेरचा श्वास घेतला. कोवीड उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. देवतळे हे चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते.

विदर्भातील नेते आणि माजी मंत्री संजय देवतळे यांना सहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर देवतळे यांनी खबरदारी म्हणून त्यांनी स्वतःची चाचणी करून घेतली आणि त्यात ते पॉसिटीव्ह आले. त्यानंतर देवतळे हे रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

हे ही वाचा:

३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती- सेरो सर्वे

५५१ ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारायला मोदी सरकारची मंजुरी

महाराष्ट्रातही होणार मोफत लसीकरण

बीपीसीएल परिसरात जम्बो कोविड सेंटरला मोदी सरकारची परवानगी

देवतळे यांची राजकीय कारकीर्द
देवतळे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात काँग्रेस पक्षापासून झाली. वरोरा विधानसभेतून ते सलग चार वेळा निवडून आले होते. त्यांनी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री म्हणून कामकाज पहिले आहे. त्याच वेळी ते चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २०१४ साली त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. पण त्यात त्यांचा पराभव झाला. २०१९ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली पण त्यातही ते पराभूत झाले. नंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला होता.

Exit mobile version