माजी आयपीएस अधिकारी आणि ‘हिंदू दहशतवाद: एक थोतांड’ या पुस्तकाचे लेखक आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बुधवार, २२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आर व्ही एस मणी यांना धमकावण्यात आले. मणी यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे.
आपल्या दैनंदिन सवयी प्रमाणे आर व्ही एस मणी हे बुधवारी पहाटे फिरायला जाण्यासाठी बाहेर पडले होते. तेव्हा अचानकपणे एक पांढर्या रंगाची क्रिटा गाडी त्यांच्या इथे थांबली. त्या गाडीत दोन इसम बसले होते. हे दोघेही गाडीतून बाहेर उतरले आणि मणी यांच्यापाशी आले. या दोघांकडून मणी यांना खुनाची धमकी देण्यात आली. मणी यांना धमकावून हे इसम गाडीत बसून निघून गेले.
हे ही वाचा:
नवा स्मार्टफोन घेतला आणि ढोल वाजले!
उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?
१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत
इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर
आर व्ही एस मणी यांनी या संदर्भात दिल्लीच्या उत्तर द्वारका पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मणी यांनी हिंदू दहशतवाद: एक थोतांड हे पुस्तक लिहून कशाप्रकारे यूपीए सरकारच्या काळात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा पर्दाफाश केला आहे. तर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातील अनेक त्रुटी आणि गफलती त्यांनी आपल्या पुस्तकातून मांडल्या आहेत.