गोव्यात काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने का दिली पक्षाला सोडचिट्ठी?

गोव्यात काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने का दिली पक्षाला सोडचिट्ठी?

देशभरात राष्ट्रीय काँग्रेसला घरघर लागल्याचे चित्र आहे. त्यात आता भर पडली आहे ती गोव्याचीही.

कॉंग्रेसचे आमदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी आज (सोमवारी) आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. आता ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अपेक्षा आहे.

फार काळ काँग्रेसचे निष्ठावंत आणि सोनिया गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे फालेरो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्यही होते. गोवा प्रदेश काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पदावर कायम ठेवण्याच्या हायकमांडच्या निर्णयामुळे ते नाराज असल्याचे समजते.

“मी, लुईझिन्हो फालेरो, २७ सप्टेंबर २०२१ रोजी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी नवलीमच्या लोकांचे आभार मानतो आणि भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये त्यांच्या निरंतर समर्थनाची अपेक्षा करतो. गोवा नवीन सुरुवात करत आहे.” फालेरो यांनी सोमवारी हे ट्विट केले.

हे ही वाचा:

किरीट सोमैय्यांचा कोल्हापूर दौरा आज सुरु, काय होणार कागलमध्ये?

जर्मन निवडणुकीनंतर चित्र अस्पष्टच?

धक्कादायक! … म्हणून तो देणार होता बायकोचा बळी!

‘जनाब राऊत एमआयएम की मोहब्बत कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे’

त्यांनी दुपारनंतर थोड्याच वेळात सभापतींना पत्र पाठवले. त्यांचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांनी त्वरित स्वीकारला आहे. लवकरच या राजीनाम्याची अधिसूचित जरी होण्याची अपेक्षा आहे.

“मी ४० वर्षांपासून काँग्रेसी आहे. मी काँग्रेस कुटुंबाचा काँग्रेसी राहीन, जर मोदींशी लढायचे असेल तर या कुटुंबाला एकत्र यावे लागेल. चारही काँग्रेसमध्ये ममतांनीच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या जुगलबंदीला कडवी झुंज दिली आहे. ममता फॉर्म्युला जिंकला आहे. त्यांना निवडणुकीत उभे राहता आले आहे. आपण गोव्यातही कठीण काळातून जात आहोत. आम्हाला अशा लढवय्यांची गरज आहे. सर्व मोठ्या पक्षांनी एकत्र येऊन पुढील लोकसभा निवडणुका लढवाव्यात अशी माझी इच्छा आहे.” असं फालेरो म्हणाले.

Exit mobile version