भारतीय जनता पार्टीचे मुंबई येथील नेते आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन झाले आहे वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले बारोट हे मुंबई महापालिकेच्या मालाड येथील प्रभाग क्रमांक ४५ चे प्रतिनिधित्व करत होते.
राम बारोट हे १९९२ साली पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर सलग सहा वेळा बारोट नगरसेवक म्हणून निवडून गेले. आपल्या या दीर्घ कार्यकाळात त्यांनी महापालिकेतील अनेक महत्त्वाची पदे भूषविली. यामध्ये मुंबईचे उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, शिक्षण समितीचे अध्यक्ष, तसेच आरोग्य समिती अध्यक्ष या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. राम बारोट यांनी मालाड विधानसभ मतदार संघातून आमदारकीची निवडणूकही लढवली होती.
हे ही वाचा:
योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी
सावळजच्या बाळू लोखंडेंची खुर्ची कशी पोहोचली इंग्लंडला?
महाराष्ट्र अंतिम फेरीत मुलांमध्ये दिल्लीशी तर मुलींमध्ये कोल्हापूरशी झुंजणार
मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात
राम बारोट यांच्या निधनाने समाजात आणि भाजपा परिवारात शोक व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील बारोट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “मुंबई भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमहापौर डॉ. रामभाऊ बारोट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. अनेक वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी विविध लोककल्याणकारी कामे केली. याही वयात सामाजिक कार्याचा वसा त्यांनी जपला होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शान्ति” असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.