महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात ते अतिदक्षता विभागात आहेत. मेंदुच्या विकारामुळे (ब्रेन हॅमरेज) त्यांना मागेही रुग्णालयात दाखल केले गेले होते पण त्यातून ते बाहेर आले होते.
सध्या मनोहर जोशी हे कोमामध्ये आहेत असे डॉक्टरांनी म्हटले आहे. मनोहर जोशी हे ८५ वर्षांचे असून २२ मे रोजी त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते. त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. ते व्हेंटिलेटरशिवाय श्वासोच्छवास करत आहेत, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली आहे.
जोशी हे १९९६पासून शिवसेनेचे सदस्य होते. १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना भाजपा युती सरकारमध्ये काम केलेले आहे. २००२ ते २००४ या कालावधीत ते लोकसभेचे अध्यक्षही होते.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार!
बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला पोलीस, परंतु अधिकाऱ्याला मारलेल्या सॅल्यूटने केला घात!
पहिल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील आंदोलकांनी आमच्या मुलांना व्यसनी केले!
गुरुवारी दुपारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांनंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटची सहकारी मानले जातात. शिक्षक म्हणून मनोहर जोशी यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली. १९६७मध्ये ते राजकारणात आले. १९७६ ते १९७७ या कालावधीत त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषविले आहे. १९९५मध्ये तुतीचे सरकार महाराष्ट्रात आले आणि मनोहर जोशींच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.
मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे आल्यानंतर मनोहर जोशी यांचे पक्षातील महत्त्व हळूहळू संपुष्टात आले. मागील काही वर्षापासून तर ते सक्रिय राजकारणात नाहीत.