शिवसेनेच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीला साद घातली. शिवसेना आणि वंचितची युती झाली. पण हि युती जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. वंचितच्या समावेशानंतर आघाडीमधीलच नेते पारपस्पर विरोधी विधाने करताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी तर थेट वंचितशी आघाडीबाबतचा प्रस्ताव आमच्यासमोर नाही अशी स्पष्ट भूमिका मांडल्याने खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. या परिषदेत माध्यमांनी पवार यांना वंचित सोबत जाणार का असा प्रश्न विचारून छेडले . त्यावर प्रतिक्रिया देतांना शरद पवार थेटच म्हणाले , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही.
हे ही वाचा:
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे
आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”
हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक
जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे काय चालले आहे, याची माहिती आम्हाला नाही. आम्ही त्या चर्चेत सहभागी नव्हतो असेही पवार यांनी स्पष्ट केले. तर दुसऱ्याच बाजूला प्रकाश आंबेडकर यांनी माझी युती सेनेबरोबरची आहे. सेनेबरोबरची युती कायम आहे. त्यामुळे मला इतरांच काही घेणं देणं नाही असे वक्तव्य केली आहे. त्या आधी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर संजयराऊत यांनी आंबेडकरांना जपून बोलण्याचा सल्ला देत शरद पवारांवर बोलताना आपल्या शब्दांची काळजी घ्यावी, असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देताना आंबेडकर मला सल्ला देणारे संजय राऊत कोण? माझी युती शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी झाली आहे. त्यांचा सल्ला मी ऐकेल. पण इतर कुणी मला सल्ला देऊ नये असे स्पष्ट केले होते. एकूणच काही महिन्यांपूर्वी सत्तेत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीत दलित नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रवेश करताच धुसफूस सुरू झाली असल्याचेच दिसून येत आहे .