राज्याच्या राजकारणात जेम्स लेनच्या पुस्तकांवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर पुन्हा जेम्स लेनची चर्चा सुरु झाली. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन जेम्स लेनच्या पुस्तकातील मजकूर चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, २००३ साली हा वाद सुरू झाला होता, त्यांनतर आता मध्येच कुठे जेम्स लेन पुढे आले आहेत. जेम्स लेनच्या पुस्तकात शिवरायांची बदनामी करण्यात आली आहे. ‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळे त्यात जे चुकीचं लिहिलं आहे ते काढून टाकावे असे आव्हाड म्हणाले आहेत. तसेच जिजामाता याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु असल्याचेही आव्हाड म्हणालेत.
जेम्स लेन यांच्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य शिवरांविरोधात, असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. तसेच आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत राजकीय परिस्थीवर बोलण्याचे टाळले आहे.
हे ही वाचा:
‘राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा’
जेम्स लेन म्हणतो, मी बाबासाहेब पुरंदरेंशी कधीही बोललो नाही!
शरद पवारांचा खोटारडेपणा उघड; तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांवर कारवाई होणार का?
राज ठाकरे ५ जूनला जाणार अयोध्येला; मुस्लिमांनाही भोंग्याचा त्रास
आव्हाड हे यावेळी पत्रकारांना देखील बोलले आहेत. ते म्हणाले, पत्रकारांचे मला आश्चर्य वाटते की, २० वर्षांनंतर त्यांना जेम्स लेन सापडला आहे. यावरूनच दिसतंय की, महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे हे उत्तम उदाहरण आहे. हा खूप मोठा कट आहे. त्या पुस्तकातून मजकूर वगळा. २००३ मध्ये गाडलेला राक्षस पुन्हा काढू नका, असे आव्हाड म्हणाले.