राहुल गांधींनी १० जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे होऊ शकणार नाहीत

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा जोरदार घणाघात

राहुल गांधींनी १० जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे होऊ शकणार नाहीत

The Union Minister for Information & Broadcasting, Youth Affairs and Sports, Shri Anurag Singh Thakur holding a press conference on Cabinet Decisions, in New Delhi on July 22, 2021.

सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने भाजपच्या टीकेचे धनी होत आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींनी १० जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे होऊ शकणार नाहीत असा जोरदार घणाघात केला आहे.

राष्ट्रीय राजधानीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जीतो अहिंसा रनमध्ये बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की,राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा अपमान केला आहे. त्यासाठी देश त्यांना कधीही माफ करणार नाही. राहुल गांधींनी १० जन्म घेतले तरी ते वीर सावरकर होऊ शकत नाहीत. वीर सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी वेचले. इंग्रजांच्या मदतीने भारताच्या लोकशाहीला कमजोर करण्यात राहुलने वेळ घालवला अशी जोरदार टीका अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी रविवारी राष्ट्रीय राजधानीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ‘आयआयएफएल जीतो अहिंसा रन’च्यामध्ये माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारावर केंद्रीय मंत्र्यांनी दोन्ही राज्यांच्या सरकारांवर निशाणा साधला. ‘दुर्दैवाने बिहार पुन्हा त्याच मार्गाने जात आहे. जशी लालूराजांच्या काळात होती. तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जंगलराज पुन्हा परतले आहे . रामनवमीच्या विरोधात एका बाजूने उभा असलेला मुख्यमंत्री हिंदूविरोधी असणे अत्यंत निषेधार्ह आहे. ममता जी, हिंदूंबद्दलही थोडी आपुलकी दाखवा.अशी टीका अनुराग ठाकूर यांनी यावेळी केली.

हे ही वाचा:

संजय राऊतांना धमकीदेवेंद्र फडणवीसांचा धमाका…

प्रा. सु. ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे कालवश

अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी ‘बुकी’ अनिल जयसिंघानीचा जामीन नाकारला

सदाबहार, रुबाबदार क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर पंतप्रधानांच्या पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मंत्री ठाकूर म्हणाले, केजरीवाल आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी बोलत आहेत. त्याचे मित्र तुरुंगात जात आहेत. भीती त्यांना सतावत आहे, त्यामुळेच ते बिनधास्त आरोप करत आहेत. न्यायालयानेही त्यांना फटकारले. पदवी सार्वजनिक क्षेत्रात असताना का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version