मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी सगेसोयऱ्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत !

भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य

मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी सगेसोयऱ्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत !

मराठा आरक्षणावरून राज्यात अजूनही राजकारण तापलेलं आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असणाऱ्यांना ओबीसी दाखले मिळणार. मात्र, सगेसोयऱ्यांना मिळणार नाही. मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी सगेसोयऱ्यांना ते आरक्षण देऊ शकणार नाहीत, असं वक्तव्य भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे. अमरावतीत रविवारी (११ ऑगस्ट) भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन सगेसोयऱ्यांना देखील त्यामध्ये समाविष्ट करण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करत आहेत. सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिले नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणावरून मनोज जरांगे यांची सध्याची भूमिका ही राजकीय दिसत असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून बोलण्यात येत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना सोडून केवळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर बोट ठेवण्याचे काम जरांगे करत असल्याचे सत्ताधारी नेत्यांनी म्हटले.

हे ही वाचा..

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ‘ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे’ पुरस्काराने सन्मानित !

बीडमध्ये भीषण रेल्वे अपघात; मेंढपाळासह २२ मेंढ्या, २ जनावरांचा जागीच मृत्यू !

अमेरिकेनेच आपल्याला सत्तेवरून हटवले

मध्य प्रदेशातील गुना येथे विमान अपघात, दोन पायलट जखमी !

या पार्श्वभूमीवर भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांनी मराठा सगेसोयरेंच्या आरक्षणावरून मोठं वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, स्पष्ट पणे सांगतो की, मराठा प्रमाणपत्रावर कुणबी लिहिले असल्यास, रक्ताची नातं असलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच आहे. ते ओबीसीमध्ये येणार, पण सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही.

ते पुढे म्हणाले की, कोणीही मुख्यमंत्री झाला. समजा, मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवली आणि ते मुख्यमंत्री झाले तरी ते ही गोष्ट साध्य करू शकणार नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत. त्यामुळे कोणीही तशा वल्गना करू नये, समाजात फूट पाडण्याचं काम करू नये. यात सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचे होईल, असे अनिल बोंडे यांनी सांगितले.

Exit mobile version