राजस्थान लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नेत्यांचे शाब्दिक हल्ले अधिक तीव्र होत आहेत. दरम्यान, राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, नरेंद्र मोदी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील तेव्हा बाबरची पोरं देखील ‘जय श्री रामचा नारा देतील’.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी चित्तौडगडच्या वल्लभनगर विधानसभा मतदारसंघातील भिंदरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय जोशी यांनी काँग्रेसच्या मागील अशोक गेहलोत सरकारवरही अनेक गंभीर आरोप केले.ते म्हणाले की, ज्यांना जय श्री राम म्हणण्यात अडचण येत आहे, मी तुम्हाला खात्री देतो की, जेव्हा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील तेव्हा बाबरचे मुलेही ‘जय श्री राम’ म्हणतील.यावेळी भाजपचे राज्य प्रभारी अरुण सिंग आणि राज्यमंत्री झवर सिंग खर्रा हे देखील उपस्थित होते.
हे ही वाचा:
काँग्रेसचे कुंभानी बेपत्ता, ८ उमेदवारांची माघार अन आता भाजपात प्रवेशाच्या बातम्या!
वेंकय्या नायडू, राजदत्त, उषा उथुप, मिथुन चक्रवर्ती यांना पद्म पुरस्कार प्रदान
‘जिथे हिंसाचार झाला तिथे निवडणुकांना परवानगी नाही’
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांची सुटका नाहीच; तिहारमधील मुक्काम वाढवला
#Rajasthan : उदयपुर जिले के भिंडर में सभा के दौरान भाजपा प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी ने दिया बड़ा बयान. कहा मोदी पीएम बनने वाले है, 'बाबर का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा'. सुनिए पूरा संबोधन.#BJP4India@abplive pic.twitter.com/cM5eKhwiqt
— vipin solanki (@vipins_abp) April 23, 2024
आपल्या भाषणादरम्यान सीपी जोशी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.ते म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सनातनला शिव्या दिल्या. काँग्रेस पक्षाने प्रभू रामाच्या जन्मावर प्रश्न उपस्थित करून त्यांना काल्पनिक ठरवले. रामनवमी आणि नववर्षाला काढण्यात आलेल्या मिरवणुकीसह हिंदू ध्वज वापरण्यावर देखील बंदी घातली.अशा स्थितीत २६ एप्रिल रोजी भाजपाला मत देऊन अशी मानसिकता असलेल्यांना गाडून टाकायचे आहे, असे सीपी जोशी म्हणाले.