26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारण...तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील

…तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील

Google News Follow

Related

बंगाल मधील तृणमूल काँग्रेसकडून होत असलेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने आज देशभरात प्रतिकात्मक धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे. कोविडचे नियम पाळून हे आंदोलन केले जात आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली येथे भारतीय जनता पार्टीने प्रतीकात्मक धरणे आंदोलन केले.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणावर ठाकरे सरकारसमोर आता ‘हा’ एकच पर्याय

ठाकरे सरकारने मराठा आरक्षण विषयाचे फक्त राजकारण केले

मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायरस- अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

गरजूंना बाजूला सारून लसींचा ओघ मंत्र्यांच्या जिल्ह्यात

या वेळी बोलताना आ. अतुल भातखळकर म्हणाले की, ‘पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या असून हे सहन करण्या पलीकडचे आहे. हे प्रकार तात्काळ न थांबविल्यास संपूर्ण देशातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कोरोनाच्या काळातही पश्चिम बंगाल मध्ये जाऊन मोठे आंदोलन करतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा