भामट्याला भामट्यांच्या टोळीचा पाठिंबा नसेल कसा?-अतुल भातखळकर

भामट्याला भामट्यांच्या टोळीचा पाठिंबा नसेल कसा?-अतुल भातखळकर

हिंदू समाजाला सडलेला समाज म्हणणारा, विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याला आपला पाठिंबा आहे, असे विधान ‘एल्गार परिषद २०२१’ च्या आयोजकांनी एका परिपत्रकातून जाहीर केले आहे. परिषदेत भारत आणि हिंदू समाजाला सडलेला समाज म्ह्टल्याप्रकरणी शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० जानेवारी २०२१ रोजी पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, एल्गार परिषदेचे एक आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी यापूर्वीच शरजीलच्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला होता. “शरजील चांगलं बोलला पण त्याने ‘मनुवादी’ ऐवजी ‘हिंदू’ शब्द वापरला ही त्याची चूक झाली,” असं कोळसे पाटील यांनी म्हटलं होतं. बी. जी. कोळसे पाटील यांनी सुद्धा संघ आणि हिंदुत्वावर अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत.

शरजील उस्मानी याला एल्गार परिषेदेने पाठिंबा देण्यात आश्चर्यकारक काहीच नाही. “भामट्याला भामट्यांच्या टोळीचा पाठिंबा नसेल कसा?” असे विधान भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे. “भाजपाची सत्ता असती तर हिंदूंचा अपमान करणाऱ्या या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या असत्या. जनाबसेनेला हे झेपणार नाही.” असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

Exit mobile version